17 Runs in 1 Ball : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 चेंडूवर 17 धावा करण्याचा विश्वविक्रम जगात एकाच फलंदाजाच्या नावावर आहे. जगातील कोणताही फलंदाज 1 चेंडूवर 17 धावा काढण्याचा विचारही करु शकत नाही, कारण हे एक अशक्य काम आहे, परंतु भारताचा एक स्फोटक फलंदाज आहे, ज्यानं हे अशक्य कामही शक्य करुन दाखवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाजही एका चेंडूवर 17 धावा करण्याचा पराक्रम करु शकले नाहीत.
Virender Sehwag 17 Runs in 1 One Ball | Cricket World Cup 2015#BANvSL #RSAvInd #SSCricket #Pujara #AskTheExpert #Rahane #NZvsPAK #bbccricket #TeamIndia #ICCAwards #ICC #BCCI #Kohli pic.twitter.com/GNR0Yfhv7X
— Abhi Jain (@AbhiJai50398392) January 27, 2018
कोणत्या फलंदाजानं केल्या 1 चेंडूवर 17 धावा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 चेंडूवर 17 धावा करण्याचा पराक्रम फक्त एकाच फलंदाजानं केला आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे. भारताचा माजी झंझावाती सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं 13 मार्च 2004 रोजी कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज राणा नावेद उल हसनच्या एका चेंडूवर 17 धावा काढल्या होत्या. आजपर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला वीरेंद्र सेहवागचा हा विश्वविक्रम मोडता आलेला नाही.
रोहित-गेलसारख्या दिग्गजांनाही करता आला नाही हा चमत्कार : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाजही एका चेंडूवर 17 धावा करण्याचा पराक्रम करु शकलेले नाहीत. वीरेंद्र सेहवागबद्दल बोलायचं झाले तर त्याची फलंदाजीची शैली वेगळी होती. वीरेंद्र सेहवागनं 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वीरेंद्र सेहवागसारखा फलंदाज भारताला अजून सापडलेला नाही.
1 चेंडूवर 17 धावा कशा झाल्या? : 13 मार्च 2004 रोजी, पाकिस्तान विरुद्ध कराची इथं खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात, पाकिस्तानी गोलंदाज राणा नावेद उल हसननं त्या षटकात वीरेंद्र सेहवागला सलग 3 नो बॉल टाकले, त्यापैकी वीरेंद्र सेहवागनं दोन चेंडूंवर चौकार मारले. यानंतर कायदेशीर चेंडूवर एकही धाव झाली नाही. यानंतर राणा नावेद उल हसननं पुन्हा दोन नो बॉल टाकले, त्यापैकी वीरेंद्र सेहवागनं एक चौकार मारला तर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. अशाप्रकारे, राणा नावेद उल हसनच्या त्या षटकात, वीरेंद्र सेहवागला 3 चौकारांसह 12 धावा आणि 5 नो बॉलमध्ये 5 अतिरिक्त धावा मिळाल्या, ज्यामुळं एकूण 17 धावा झाल्या.
सेहवागची कारकिर्द कशी : वीरेंद्र सेहवागनं भारतासाठी 104 कसोटी सामन्यांत 49.34 च्या सरासरीनं 8586 धावा केल्या, ज्यात 23 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 319 आहे. वीरुनं 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8273 धावा केल्या ज्यात 15 शतकं आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये वीरुचा सर्वोत्तम स्कोर 219 आहे. याशिवाय वीरुनं 19 T20 सामन्यांमध्ये 394 धावा केल्या, त्यापैकी 68 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
हेही वाचा :