ETV Bharat / spiritual

तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाला वाहा 'ही' शिवामूठ; 'अशी' करा महादेवाची पूजा - Third Shravan Somwar 2024 - THIRD SHRAVAN SOMWAR 2024

Third Shravan Somwar 2024: महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील (Shravan 2024) सर्व सोमवारी केली जाते. 19 ऑगस्ट 2024 हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे. श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात. आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ (Shivamuth) वाहायची. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

3rd Shravan Somwar 2024
तिसरा श्रावणी सोमवारी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 7:55 AM IST

हैदराबाद Third Shravan Somwar 2024 : श्रावणाची (Shravan 2024) सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जात. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरूवात सोमवारी झाली आहे. आता बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून येत आहे. त्यामुळं यंदाचा श्रावण हा शुभ मानला जात आहे.

श्रावणाचा तिसरा सोमवार : महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते. 19 ऑगस्ट 2024 हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे. श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात.

या पद्धतीनं करावी महादेवाची पूजा : सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा. यानंतर भगवान शिवला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुले, मध, फळे, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी.

आज कोणती शिवामूठ ? : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी 'मूगाची' शिवामूठ आहे. या दिवशी तुम्ही मूग शिवलिंगाला वाहू शकता. यामुळं भगवान महादेव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल.

शिवामूठ करण्याची पद्धत : विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

हेही वाचा -

  1. नवीन कार्याची सुरूवात करण्यास ऑगस्टचा तिसरा आठवडा अनुकूल; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope
  2. आज पहिला श्रावण सोमवार; महादेवाला वाहावी 'ही' शिवामूठ, सर्व माहिती वाचा एका क्लिकवर - Shravan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.