ETV Bharat / spiritual

'या' 5 राशींचा उत्तम काळ, व्यवसायात होणार मोठा आर्थिक लाभ; कामात मिळेल पदोन्नती- वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 5:55 AM IST

मेष (Aries) : ह्या आठवड्यात आपणास परिश्रम आणि प्रयत्नांचे मिश्र फळ मिळेल. जर आपण कारकिर्दीसाठी-व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर आपणास संधी तर मिळतील, परंतु त्या आपल्या मना प्रमाणे नसतील. असं असलं तरी हाती आलेली संधी सोडू नका. व्यवसायात तात्कालिक फायदा करण्याच्या नादात दीर्घ कालीन नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोणतीही जोखीम घेण्याची चुक करू नका. पोटाचे विकार संभवतात. अशावेळी आहार व दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावं. कठीण प्रसंगी वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे उभा राहील. ह्या आठवड्यात स्वतंत्र राहण्याची आपली इच्छा, संयमित न राहण्याची आपली कामना, आपणास कुटुंब आणि नातेवाईकांपासून दूर घेऊन जाऊ शकते. द्विधा मनःस्थिती झाल्यास शुभचिंतकांचा सल्ला घ्यावा व कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी खूप विचार करावा.

वृषभ (Taurus) : हा आठवडा आपणास शुभ फलदायी व सौभाग्यदायी आहे. कारकिर्द आणि व्यवसायाच्यादृष्टीनं ह्या आठवड्यात आपणास एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांची आपल्यावर कृपा होऊन आपणास आवडत्या ठिकाणी बदली किंवा जवाबदारी मिळू शकते. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. दांपत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या वयस्कर किंवा प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात लाभदायी ठरेल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. मन रमेल अशा ठिकाणी किंवा आपला एखादा छंद व आवड, मुलांशी संबंधित गोष्टी आपल्या आनंदाचे स्रोत असतील. आपल्या प्रवृत्तींचा आवाका व विस्तार मोठा होईल. आपल्या क्षमतेत, सहनशीलतेत मदत करण्याच्या इच्छेत वाढ झाल्यानं आपला लाभ होईल.

मिथुन (Gemini) : ह्या आठवड्यात आपल्यावर कामाचा व जवाबदारीचा खूप भार राहील. जर आपल्या जीवनाशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येमुळं आपण मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला असाल तर त्रासून जाण्याऐवजी डोके शांत ठेवून समस्येवर इलाज शोधण्याचा प्रयत्न करा. व्यापारात थोडा लाभ होण्याची संभावना आहे. व्यापार वृद्धी करण्यासाठी किंवा कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करणं हितावह होईल. कार्यक्षेत्री कोणाशी वाद घालण्या ऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या अखेरपर्यंत वैवाहिक जोडीदारासह एखादी धार्मिक यात्रा संभवते. प्रणयी जीवनात जर प्रेमिकेशी काही कारणाने कटुता निर्माण झाली असेल किंवा काही गैरसमज झाले असतील तर एखाद्या मित्राच्या मदतीनं बिघडलेल्या संबंधात सुधारणा होऊ शकेल. घरातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळं आपलं मन चिंतीत होऊ शकते.

कर्क (Cancer) : हा आठवडा आपली स्वप्नपूर्ती करणारा आहे. संपूर्ण आठवडाभर आपणास नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. पदोन्नतीची मनोकामना पूर्ण होऊ शकते. ह्या आठवड्यात कौटुंबिक बाबतीत आपणास अधिक वेळ आणि लक्ष द्यावं लागेल. असं असलं तरी वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या उत्तम समन्वयामुळं आपण आपल्या समस्यांचं निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. इतकेच नव्हे तर कुटुंबियांच्या सहवासात हसत - खेळत वेळ घालविण्यात यशस्वी व्हाल. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची संभावना आहे. कुटुंबियांकडून होकार मिळाल्यावर प्रेम संबंधाचे रूपांतर विवाहात होऊ शकेल. प्रकृती सामान्यच राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कार्यालय ह्यात समन्वय साधण्यात थोडा त्रास होऊ शकतो. व्यापारानिमित्त परदेश प्रवास सुद्धा संभवतो.

सिंह (Leo) : ह्या आठवड्यात लहान-सहान गोष्टींना महत्व देण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करणं हितावह होईल. असं केल्यानं आपणास समाधान आणि आत्मसाक्षात्कार झाल्याचा अनुभव होईल. ह्या आठवड्यात आपण आपल्या कारकिर्दीत प्रगती कराल. कार्यक्षेत्री सहकारी वर्गाबरोबरच वरिष्ठांचे सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल. आपण जर एखाद्या व्यक्तीस विवाहासाठी मागणी घालू इच्छित असाल तर एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात हसत - खेळत वेळ घालवतील. दांपत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या अखेर पर्यंत मुलांकडून एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. ऋतू बदलात आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आपल्या स्वजनांच्या भावना दुर्लक्षित करू नका, अन्यथा समस्यांचं निराकरण करण्याचं यश मिळण्याऐवजी टीका होण्याची संभावना आहे.

कन्या (Virgo) : ह्या आठवड्यात काही विवाद मानसिक त्रास वाढविण्यास कारणीभूत होऊ शकतात. आठवड्याच्या सुरूवातीस आव्हाना प्रति आपणास क्रोध अनुभवास येऊ शकतो. आपल्या प्रकृतीकडं दुर्लक्ष करणं मोठ्या समस्येस कारणीभूत होऊ शकते. आर्थिक नियोजन करा, अन्यथा आर्थिक संकट आपल्या त्रासांचे मोठे कारण होऊ शकते. कोणाच्या प्रलोभनास बळी पडून कोणतेही पाऊल उचलू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत बदल होत असल्याचं आपणास दिसून येईल. ह्या दरम्यान आपणास प्रेमिका किंवा वैवाहिक जोडीदाराशी जवळीक व नात्यातील दृढता जाणवेल. प्रेमिका किंवा वैवाहिक जोडीदार आपल्यासाठी कोणत्याही कठीण आव्हानांचा सामना करणं सोपं करेल व जीवनाचा अर्थ विस्तारित करेल. मातेच्या प्रकृतीमुळं आपले मन काहीसे चिंतीत होईल. ऋतू बदल होत असल्यानं कोणत्याही प्रकारे प्रकृतीकडं दुर्लक्ष करू नका. आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावं.

तूळ (Libra) : ह्या आठवड्यात नवीन ओळखी करण्यात आणि स्वकियांच्या भेटीगाठी वाढविण्यात आपला बराचसा वेळ जाईल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीनं अनेक दिवसांपासून स्थगित असलेले काम त्वरित झाल्यानं आपलं मन प्रसन्न होईल. कारकीर्द-व्यवसायानिमित्त केलेले प्रवास सुखद होऊन उन्नतीस कारणीभूत होतील. जमीन-घराच्या खरेदी-विक्रीत मोठा लाभ संभवतो. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रकृती सामान्यच राहील. अशावेळी आपलं तन आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी आपण जर ध्यान-धारणा आणि योगासने केलीत तर ते जास्त हितावह होईल. आपण जर कोणाच्या प्रेमात आधीपासूनच असाल तर कदाचित त्याचे रूपांतर विवाहात होईल. कुटुंबीय आपल्या प्रेमास अनुमतीचा शिक्का मोर्तब करतील. मुलांशी संबंधित गोष्टी आणि त्यात सुद्धा बेचैनी आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जाईल.

वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस प्रकृती संबधी एखादी समस्या आपणास त्रस्त करू शकते. बदलत्या ऋतूत आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपण जर पूर्वी पासून एखाद्या रोगाने पीडित असाल तर त्याकडं कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नका, अन्यथा रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात. आपण जर एखाद्या व्यक्तीस मागणी घालू इच्छित असाल किंवा रुसलेल्या जोडीदारास खुश करण्याचा विचार करत असाल तर एखादी लहानशी भेटवस्तू देऊन तसे करू शकता. आपल्यात आपलं प्रेम मिळविण्याची व त्यांच्याशी जवळीक साधण्याची उत्कटता असल्याचं दिसून येईल. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी प्राप्त होईल. ह्या आठवड्यात बुद्धिपूर्वक आणि सावध राहून केलेली आर्थिक गुंतवणूक आपली स्वप्नपूर्ती करण्यास मदतरूप होऊ शकते. परंतु, कोणत्याही जोखीम असलेल्या कामात आपणास नुकसान सोसावे लागू शकते, हे ध्यानात ठेवावे.

धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्या जीवनात नवीन संधी घेऊन येणारा आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठ आपल्या कामानं खुश होऊन आपल्यावर मोठी जबाबदारी किंवा पद सोपविण्याची संभावना आहे. एकंदरीत ह्या आठवड्यात कारकिर्दीत व व्यवसायात अशा दोन्ही ठिकाणी उन्नती होण्याची संभावना आहे. व्यवसायानिमित्त दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. जर आपणास व्यवसायात मागील काही दिवसांपासून नुकसान सोसावं लागलं असलं तर ह्या आठवड्यात होणाऱ्या एखाद्या मोठ्या सौद्याने त्याची भरपाई होऊ शकेल. पदोन्नती संभवते. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेशी जवळीक वाढेल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. एखाद्या शुभचिंतकाच्या किंवा मित्राच्या मदतीने प्राप्तीचे नवीन स्रोत मिळून संचित धनाची वृद्धी होईल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होऊ शकते.

मकर (Capricorn) : ह्या आठवड्यात आपणास तात्कालिक फायद्याच्या नादात दूरवरचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्री आपल्या कामात कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नका, अन्यथा आपणास वरिष्ठांच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या मध्यास आपणास आपले घर किंवा कुटुंबीय यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यासाठी आपले काम, आपला व्यवसाय यांच्याबरोबरीनं वास्तविक स्वभावाचा समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचं जाणवेल. आपण आपल्या प्रकृतीकडं दुर्लक्ष करू नये. तसेच जे आपली काळजी घेतात अशा लोकांची अवहेलना करू नये. प्रणयी जीवनात विचारपूर्वक वाटचाल करावी. वैवाहिक जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका. आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपणास अतिरिक्त प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात व सामाजिक जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ आपण घालवू नये.

कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. ह्या आठवड्यात चांगल्या संबंधांवर आधारित भागीदारी होण्याची संभावना आहे. हि भागीदारी एक सुखद भविष्य निर्माण करण्यास आपल्याला मदतरूप होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. अनेक दिवसांपासून कुटुंबियांकडून आपणास प्रेमाची व स्नेहाची गरज होती, त्याची प्राप्ती आपणास आपल्या स्वजनांकडून होईल. आठवड्याच्या सुरूवातीस आपण ज्या कामात किंवा सौद्यात जोखीम घ्याल त्यात लाभान्वित व्हाल. ह्या आठवड्यात आपण एखाद्या मोठ्या कर्जातून किंवा समस्येतून मुक्त होऊ शकता. आठवड्याच्या सुरूवातीस ध्यान - धारणेत व धर्मात आपली रुची वाढेल. एखादी धार्मिक यात्रा संभवते.सुख - सोयींशी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसा खर्च होईल. ह्या आठवड्यात आपण जीवनाशी संबंधित चांगल्या वस्तू व सामाजिकतेचा आनंद घेऊ शकाल.

मीन (Pisces) : ह्या आठ्वड्यात आपल्यावर कार्यालयीन कामाचा थोडा जास्त भार राहील. कामातील व्यस्ततेमुळं कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यात आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. आपण व्यक्तिगत व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारचे लाभ प्राप्त कराल. असं असून सुद्धा आर्थिक बाबतीत आपलं समाधान होणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात रोजगाराच्या क्षेत्रात विशेष यश प्राप्त होण्याची संभावना आहे. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यात आपली पत्नी विशेष भूमिका बजावेल. गैरसमज दूर झाल्यानं आपणास दिलासा मिळेल. प्रकृती सामान्यच राहील. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने सरकारी लाभ प्राप्त करण्यात आपण यशस्वी व्हाल. हा आठवडा भावी योजना बनविण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.