ETV Bharat / spiritual

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 5:12 AM IST

  • मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मकतेचा आहे. आपण जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आपली हि मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. व्यापारात अपेक्षित लाभ होईल. प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होतील. एकंदरीत हा आठवडा आर्थिकदृष्ट्या खूपच अनुकूल आहे. असं असलं तरी ह्या आठवड्यात आपणास गुप्त शत्रू तसेच ज्या व्यक्ती आपणास भ्रमित करण्याचा प्रयत्न सतत करत असतात त्यांच्या पासून सावध राहावं लागेल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. मुलांना सुद्धा आपले विचार पटतील. आठवड्याच्या अखेरपर्यंत भौतिक सुख साधनांशी संबंधित एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करू शकाल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेशी जवळीक वाढेल. प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना सुद्धा आहे.
  • वृषभ (Taurus) : ह्या आठवड्यात आपणास आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवावं लागेल. कोणतेही कार्य करताना घाई करू नये तसेच वाहन चालवताना सावध राहावं, अन्यथा एखादी दुखापत होण्याची संभावना आहे. लहान-सहान समस्या आणि व्यक्तिगत जीवनातील जवाबदाऱ्या असून सुद्धा मित्रांच्या घोळक्यात राहणं आपणास दिलासा देणारा असेल. कार्यक्षेत्री लोकांच्या गोष्टींकडं लक्ष देण्याऐवजी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात जाईल. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम केल्यासच यश प्राप्त होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ऋतुजन्य आजार होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रणयी जीवनात सावध राहून पुढे जावे, अन्यथा समस्येला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः आपल्या प्रेम संबंधाचे प्रदर्शन मांडू नये.
  • मिथुन (Gemini) : कोणतेही आव्हान किंवा समस्या आपल्या धाडसाहून मोठे नसते. हि गोष्ट ह्या आठवड्यात आपणास लक्षात ठेवावी लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्री कामाचा अतिरिक्त भार राहील. कोणत्याही मोठ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कार्यालय ह्यात समन्वय साधण्यात काही त्रास होऊ शकतो. कारकिर्दी व व्यवसायाच्या दृष्टीनं आठवड्याची सुरूवात जरी मोठ्या समस्येने झाली तरी उत्तरार्धात गोष्टी आपल्या मनाप्रमाणं होताना दिसून येईल. प्रणयी जीवनाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना आपल्या कुटुंबियांच्या भावना दुर्लक्षित करू नका, अन्यथा नंतर आपणास पश्चाताप करावा लागू शकतो. प्रणयी जीवनात सावधपणे पुढचे पाऊल उचलावे. आपल्या प्रेमिकेच्या भावना आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
  • कर्क (Cancer) : ह्या आठवड्यात आपणास निव्वळ आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रित करावं लागेल. कार्यालयात आपल्या कनिष्ठांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका. कार्यक्षेत्री वरिष्ठांच्या बरोबरीने कनिष्ठांचे सुद्धा सहकार्य मिळाले तरच कार्यसिद्धी संभवते हे आपणास लक्षात ठेवावं लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कार्यक्षेत्र, व्यवसाय इत्यादीत चढ-उतार येतील. परिश्रमाच्या मानानं थोडे कमी फल मिळाल्यानं मन काहीसे निराश होईल. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. प्रेम प्रसंगात परस्पर सहकार्याच्या भावनेत कमतरता येईल. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय साधण्यात सुद्धा थोडी कमतरता जाणवेल. आठवड्याच्या अखेरीस एखादा दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो.
  • सिंह (Leo) : हा आठवडा आपणास सुख, शांती व लाभ देणारा आहे. अनेक दिवसांपासून स्थगित असलेली कामे एखाद्या मित्राच्या किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं पूर्णत्वास जातील. व्यवसाय वृद्धीसाठी एखादी योजना तयार कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात सुख-सुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घ्यावा. कार्यक्षेत्री आपला मान-सन्मान उंचावेल. वरिष्ठ आपल्या कार्याची प्रशंसा करतील. माता-पित्यांकडून यथा संभव सुख, सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य संभवते. हा आठवडा प्रकृतीच्यादृष्टीनं सामान्यच आहे. प्रणयी जीवनातील सर्व गैरसमज दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकाल. आठवड्याच्या अखेरपर्यंत मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.
  • कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कार्यक्षेत्री कामाचा अतिरिक्त भार राहील, ज्याची पूर्तता करण्यासाठी जास्त परिश्रम करावं लागतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या व्यवहारात आणि व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील. आपण जर असे करण्यात यशस्वी झालात तर आपली अवघडातील अवघड कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबियांच्या भावना व अपेक्षा दुर्लक्षित करू नका. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीच्या जोडीने संबंधांची सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रणयी जीवनात आपल्या प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात जास्त ढवळाढवळ करू नये, अन्यथा संबंध बिघडू शकतात. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी वैवाहिक जोडीदाराच्या गरजा समजून घेऊन आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ त्यांच्यासाठी काढावा.
  • तूळ (Libra) : आठवड्याच्या सुरूवातीस एखाद्या कार्यात मिळालेले मोठे यश आपल्या आनंदास कारणीभूत ठरेल. कारकिर्दी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं दूरवरचे प्रवास संभवतात. मित्रांकडून विशेष सकारात्मक सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात आपली पदोन्नती किंवा आवडत्या ठिकाणी बदली मिळण्याची मनोकामना पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावं तसेच त्याच्याशी संबंधित धोके नीट समजून घ्यावेत. असं असलं तरी सट्टा किंवा लॉटरी यापासून थोडे दूर राहणं हितावह होईल. आरोग्याच्यादृष्टीनं हा आठवडा सामान्यच आहे. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. अचानकपणे वैवाहिक जोडीदारा बरोबर फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. प्रेम प्रसंगात सावध राहून पाऊल उचलावे. आपल्या प्रेमिकेच्या भावनांचा आदर करावा.
  • वृश्चिक (Scorpio) : ह्या आठवड्यात आपणास कामानिमित्त खूप धावपळ करावी लागू शकते. आठवड्याच्या अखेरपर्यंत सर्व समस्या दूर होऊन कार्यक्षेत्री अपेक्षित यश प्राप्त होईल. कंत्राटावर काम करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री आपले विचार इतरांवर लादू नका व सहकाऱ्यांशी मिळून-मिसळून राहा. अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतकेच नव्हे तर आपली प्रतिष्ठा सुद्धा डागाळली जाऊ शकते. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाणं टाळावं. आपली दिनचर्या आणि आहार याकडं विशेष लक्ष द्यावं. प्रेम प्रसंगात कोणताही निर्णय घाई घाईत घेऊ नका. एकमेकांच्या गरजा व भावनांचा आदर करा. असं केल्यास बिघडत चाललेले संबंध पूर्ववत होतील. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील.
  • धनु (Sagittarius) : ह्या आठवड्यात आपणास वेळ व पैसा असे दोघांचे नियोजन करावं लागेल, अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घराच्या दुरुस्तीशी किंवा सुख - सुविधांशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना आपल्या आर्थिक स्थितीचा विचार अवश्य करावा, अन्यथा नंतर उसनवारी करण्याची पाळी येऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी मिळून - मिसळून राहा. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबी कोर्ट-कचेरीच्या बाहेर सोडविणं हितावह होईल. पोटाशी संबंधित विकार संभवतात. तेव्हा आपल्या आहारावर लक्ष ठेवावं. थोडा वेळ ध्यान - धारणा व योगासन यासाठी काढावा. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. वैवाहिक जोडीदाराशी लटक्या भांडणांसह प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील. प्रणयी जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं मन व्यथित होईल. प्रेमिकेच्या गैरसमजांचे निराकरण करताना वाद घालण्या ऐवजी संवाद साधावा.
  • मकर (Capricorn): ह्या आठवड्यात आपणास आळस आणि निष्काळजीपणा दूर ठेवावा लागेल. अन्यथा आपणास मोठं नुकसान सुद्धा सोसावं लागू शकते. व्यापारात मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. तात्पुरत्या फायद्याच्या मोहानं मोठं नुकसान होऊ देऊ नका. आर्थिक बाबीत विचारपूर्वकच कोणताही निर्णय घ्यावा. जमीन, घर किंवा वाहन इत्यादीची खरेदी करताना स्वजनांच्या सल्ल्याकडं दुर्लक्ष न करता विचारपूर्वकच निर्णय घ्या. प्रणयी जीवनात असलेल्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी एखाद्या महिला मित्राची मदत उपयुक्त होऊ शकते. गोष्ट प्रेम संबंधांशी संबंधित असो किंवा कुटुंबाशी, सर्वाना बरोबर घेणं हितावह होईल. वाणी संयमित ठेवून कटू वचन टाळावेत. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण समयी वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. घरातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळं मन चिंतीत होईल.
  • कुंभ (Aquarius): हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ह्या दरम्यान आपली दुर्बल बाजू शत्रूंसमोर येऊ देऊ नका, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतील. ह्या दरम्यान आपणास आपल्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना आपले कुटुंबीय आपल्या बरोबर राहतील. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या मानाने उत्तरार्ध थोडा जास्त चांगला आहे. धार्मिक, सामाजिक कार्यात जास्त वेळ जाऊन आपला मान व प्रतिष्ठा उंचावेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास करावे लागतील. हे प्रवास सुखद व लाभदायी होतील. प्रवासात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख संभवते, ज्यांच्या मदतीनं भविष्यात लाभदायी योजना होतील. प्रेमसंबंध दृढ होण्यासाठी परस्पर समन्वय गरजेचा आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल.
  • मीन (Pisces) : जर एक पाऊल मागे जाऊन दोन पाऊले पुढे जाण्याची संभावना असेल तर असं करण्यात ह्या आठवड्यात अजिबात संकोच करू नका. ह्या आठवड्यात आपण जर आपल्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य दिशेने उपयोग केलात तर आपणास आपल्या कार्यात नक्कीच यश प्राप्त होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनानं घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. महिलांचा बहुतांश वेळ पूजा-पाठ किंवा धार्मिक प्रवृत्तीत जाईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यच आहे.

हेही वाचा -

‘या’ पाच राशींवर शनीचा राहील प्रभाव; वाचा राशी भविष्य - Rashi Bhavishya For 22 June

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.