ETV Bharat / spiritual

नवीन कार्याची सुरूवात करण्यास ऑगस्टचा तिसरा आठवडा अनुकूल; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 12:21 AM IST

  • मेष (Aries) : हा आठवड्याची सुरूवात लाभदायक ठरणारी आहे. ह्या आठवड्यात सर्व प्रकारचे अडथळे व अडचणी असून सुद्धा आपल्या कार्यात यश मिळविण्यात आपण यशस्वी व्हाल. असं असलं तरी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीनं सामान्यच आहे. प्रेम संबंध दृढ होतील. आपली मधुर वाणी बिघडलेली कामे सुधारण्यास मदतरूप होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. लहान भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यास कार्यक्षेत्री संघर्षानंतर कार्य सिद्धी होण्याची संभावना आहे. ईश्वर साधना-आराधना आणि त्याप्रति विश्वास, आस्था वाढेल. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
  • वृषभ (Taurus) : या आठवड्यात घरातील आणि बाहेरील लहान-सहान गोष्टींना महत्व देऊ नका. क्रोधीत होऊन किंवा आवेशात येऊन कोणालाही अपशब्द बोलू नका. संपत्तीच्या खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. बाजारात अडकलेला पैसा सुद्धा अप्रत्यक्षपणे मिळेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धा पर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. जर प्रेमिकेशी संबंधात कटुता आली असेल तर प्रयत्न केल्यास सर्व गैरसमज दूर होऊन आपले प्रणयी जीवन पूर्ववत होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात दूरवरचा प्रवास संभवतो. आईची प्रकृती आपणास चिंतीत करू शकते. मुलांना मिळालेल्या एखाद्या मोठ्या यशामुळं आपल्या मान-सन्मानात वृद्धी होईल.
  • मिथुन (Gemini) : या आठवड्यात आपलं जीवन संथ गतीनं वाटचाल करत असल्याचं आपणास जाणवेल. निर्धारित काम वेळेवर न झाल्यानं मन बेचैन होईल. कार्यक्षेत्री कामाचा भार वाढेल. कामाच्या ठिकाणी लक्ष्यांक पूर्ण होण्यास अडचणी येऊ शकतात. जर आपल्या समोर आर्थिक समस्या असेल तर आठवड्याच्या पूर्वार्धात त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. जमीन, घर किंवा वाहन यांच्या खरेदी-विक्रीची योजना काही काळासाठी स्तंभित होऊ शकते. ह्या आठवड्यात आहाराकडं विशेष लक्ष द्यावं. पोटाचे विकार संभवतात. जर आपल्या प्रणयी जीवनात रुसवे-फुगवे झाले असतील तर आपण एखादी सुंदरशी भेटवस्तू देऊन प्रेमिकेची समजूत काढू शकता. पती-पत्नी दरम्यान प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील. मुलांना खुश करण्यासाठी खिसा थोडा जास्त प्रमाणात रिकामा करावा लागू शकतो.
  • कर्क (Cancer) : या आठवड्यात आपली कामे बिघडवण्याच्या प्रयत्नात ज्या व्यक्ती असतात त्यांच्यापासून आपणास योग्य अंतर ठेवावे लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. प्रणयी जीवनात सावधपणे वाटचाल करावी लागेल. कोणत्याही प्रसंगी जोशात येऊन काही करू नका, अन्यथा सामाजिक बदनामी होण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं मन चिंतीत होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात वरिष्ठांच्या मदतीनं कार्यक्षेत्री होणाऱ्या त्रासांचे निराकरण होण्याची संभावना आहे. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीनं मिश्र फलदायी आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबीत कोर्ट - कचेरीच्या बाहेर प्रश्न सुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित त्याचा लाभ घ्यावा, अन्यथा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी आपणास दीर्घ कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
  • सिंह (Leo): हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आणि सौभाग्यदायी आहे. युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीतील रुची वाढेल. मित्रांच्या सहवासात मौज-मजा करण्यात भरपूर वेळ जाईल. जमीन, घर, वाहन इत्यादींची खरेदी-विक्री करण्याची मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. माता-पित्यांकडून स्नेह व सहकार्य प्राप्ती होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आपलं प्रेम संबंध विवाहात परिवर्तित होण्याची संभावना आहे. कुटुंबीय आपल्या प्रणयी जीवनाचा स्वीकार करतील. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच अनुकूल आहे. त्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. मुलांचं सहकार्य मिळेल.
  • कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा धावपळीचा आहे. आठवड्याच्या सुरूवातीस कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक बाबीत नियोजनबद्ध काम करणं लाभदायी होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. प्रणयी जीवनात स्वतःशी व प्रेमिकेशी एकनिष्ठ राहावे. एकाचवेळी दोन ठिकाणी पाय ठेवल्यास आपणास समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी रुसवे-फुगवे होऊन सुद्धा दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. खाण्या-पिण्याकडं विशेष लक्ष द्यावं, अन्यथा पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्यानं मनात हताशेची भावना उत्पन्न होईल, परंतु सकारात्मक चिंतनानेच आपली उन्नती व प्रगती होईल याची जाणीव ठेवावी.
  • तूळ (Libra) : या आठवड्याच्या सुरूवातीस कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित काही त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान कार्यक्षेत्री आपणास वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळणे काहीसे कठीणच होईल व त्याच्या जोडीने कामाचा व्याप सुद्धा वाढलेला असेल. अर्थात हि परिस्थिती जास्त दिवस राहणार नसून आठवड्याच्या मध्यापर्यंत गोष्टी सुरळीत होत असल्याचं दिसून येईल. आपणास पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळू लागेल. एखादा मोठा निर्णय घेताना आपणास भावंडां सहित कुटुंबातील इतर सर्वांचे समर्थन प्राप्त होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी धार्मिक यात्रा संभवते. प्रेम संबंध प्रगल्भ होऊन प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधला जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ होईल. ज्यांना आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवावयाची आहे, त्यांची मनोकामना पूर्ण होईल.
  • वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. जे विद्यार्थी परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यशस्वी होण्यासाठी ह्या आठवड्यात कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास आपले गुप्त शत्रू सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळं आपणास अत्यंत सतर्क राहावं लागेल. कामाच्याठिकाणी आपल्या योजना पूर्ण होण्याआधी त्या उघड्या करू नयेत, अन्यथा आपले विरोधक त्यात खोडा घालण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. ह्या दरम्यान आर्थिक देवाण-घेवाण करताना अत्यंत सावध राहावं, अन्यथा एखादे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. रुसव्या-फुगव्यासह प्रेम संबंध सामान्य राहतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
  • धनु (Sagittarius) : या आठवड्याची सुरूवात दूरवरच्या किंवा जवळच्या प्रवासाने होईल. ह्या दरम्यान आपण आपल्या कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकता. आपला प्रवास सुखद व मनोरंजक होईल. कारकिर्दीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीसच अपेक्षित पद प्राप्त होऊ शकते. एखाद्या सिद्धीमुळं आपणास सन्मानित सुद्धा केले जाऊ शकते. त्यामुळं आपल्या मान-सन्मानात वाढ होईल. ह्या दरम्यान मुलांकडून सुद्धा एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आपण जर दीर्घ काळापासून आपला व्यवसाय सुरु करण्याचा किंवा असलेल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपली हि मनोकामना पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट संभवते. स्वकियांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मीयता वाढेल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा अत्यंत शुभ फलदायी आहे. प्रेमिकेच्या सहवासात भरपूर वेळ घालविण्याची संधी मिळेल. कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहावर शिक्कामोर्तब करू शकतात. दांपत्य जीवन सुखद होईल.
  • मकर (Capricorn) : या ह्या आठवड्यात आपणास सभोवतालच्या घटनांकडं लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आपण जर आपल्या जीवनातील समस्या शांतपणे एक-एक करून सोडविण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तसे करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ व्यक्तीचा किंवा आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेमीजनांनी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक माध्यमावर आपल्या प्रणयी जीवनाचे प्रदर्शन मांडू नये, अन्यथा आपणास समस्यांना निष्कारण सामोरे जावे लागू शकेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यक्षेत्र ह्यात समतोल साधण्यात थोडा त्रास होऊ शकतो. असं असलं तरी ह्या दरम्यान त्यांना त्यांच्या जोडीदाराचे पूर्ण समर्थन व सहकार्य मिळत राहील. आपणास जर परदेशात स्थायी व्हावयाचं असेल किंवा आपण तेथे रोजगारासाठी प्रयत्नशील असाल तर त्यासाठी आपणास अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
  • कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपणास कारकिर्दीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस व्यवसायानिमित्त केलेले प्रवास सुखद व लाभदायी होतील. कार्यक्षेत्री वरिष्ठांची कृपादृष्टी राहील, तसेच कनिष्ठ सुद्धा पूर्ण सहकार्य करतील. ह्या आठवड्यातील मुख्य बाब म्हणजे आपणास जीवनात प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होण्याची असलेली शक्यता हि होय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीची अतिरिक्त साधने मिळतील. आठवड्याच्या मध्यास एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची झालेली ओळख भविष्यात मोठा लाभ मिळवून देण्यास कारणीभूत ठरेल. जमीन-घर यांच्या खरेदी-विक्रीत माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आपण जर एखाद्या व्यक्ती समक्ष आपले प्रेम व्यक्त करण्याचा विचार करून तसे केले तर आपणास होकार मिळू शकतो. ज्या व्यक्ती पूर्वीपासून प्रेम संबंधात आहेत त्यांच्या प्रेम विवाहास कुटुंबियांकडून स्वीकृती मिळू शकते. दांपत्य जीवन सुखद होईल.
  • मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी व यशदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस जीवनाशी निगडित सर्व प्रकारच्या संधी आपलं दार ठोठावत असल्याचं दिसून येईल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना उत्तम संधी प्राप्त होईल. आपणास जर परदेशात जाऊन शिक्षण घ्यावयाचं असेल किंवा तेथे जाऊन नोकरी करावयाची असेल तर आपली हि मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होईल. असं असलं तरी ह्या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आपण ऋतुजन्य आजारास बळी पडू शकता. ह्या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनास गती येईल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात हसत - खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-जुमल्याशी किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित विवाद व अडथळे दूर होतील. कोर्ट-कचेरीशी संबंधित खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल. व्यापारात अपेक्षित लाभ व प्रगती होत असल्याचं पहावयास मिळेल.

हेही वाचा -

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट: कोणत्या वेळेत बांधावी राखी? जाणून घ्या, शुभ मुहूर्त - Raksha Bandhan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.