ETV Bharat / spiritual

सर्व पित्री अमावस्येला 'या' पितरांचं करा श्राद्ध; ब्राह्मणाला करा 'या' गोष्टी दान - Sarvapitri Amavasya 2024 - SARVAPITRI AMAVASYA 2024

Sarvapitri Amavasya 2024 : पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यंदाचा पितृपक्ष (Pitru Paksha 2024 ) 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत चालेल. या दरम्यान पिंडदान, तर्पण, हवन आणि अन्नदानाला विशेष महत्व आहे. याची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होते आणि अश्विन महिनाच्या अमावास्येला (Amavasya 2024) म्हणजेच 'सर्वपित्री अमावास्येला' सांगता होते. तर जाणून घ्या कधी आहे सर्वपित्री अमावस्या आणि श्राद्ध तर्पण करण्याची योग्य वेळ.

Sarvapitri Amavasya 2024
सर्वपित्री अमावस्या 2024 (Etv Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 8:43 PM IST

Updated : Oct 1, 2024, 5:30 PM IST

हैदराबाद Sarvapitri Amavasya 2024 : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास 'पितृपक्ष' (Pitru Paksha 2024) या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात, पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर 'सर्वपित्री अमावस्याला' सर्व (Amavasya 2024) पितरांचं श्राद्ध कर्म होऊ शकतं, असं हिंदू धर्मात सांगितलं.

सर्व पित्री अमावस्याला करा श्राद्ध : पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याची तृप्ती होऊन त्यांना शांती मिळते असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर 'सर्वपित्री अमावस्याला' सर्व पितरांचं श्राद्ध कर्म करू शकता. मृत्यूनंतर जर पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म झाले नाही, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.

अमावस्या तिथी : यंदा सर्वपित्री अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्यानं मान्यतेनुसार, 02 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केलं जाईल. पंचांगानुसार पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी कुतुप, रौहीन इत्यादी शुभ मुहूर्त मानले जातात. श्राद्ध संबंधित विधी दुपारच्या शेवटी करावेत. श्राद्धाच्या शेवटी तर्पण केलं जातं.

'या' गोष्टी करा दान : पूर्वजांच्या इच्छानुसार दान करा. या काळात गाईला दान केलं पाहिजे. यानंतर तूप, चांदी, पैसा, फळ, मीठ, तीळ, कपडे आणि गुळाचे दान करावे, या दानाचा संकल्प केल्यानंतर, आपल्या ब्राम्हणाला द्यावे. श्राध्द काळात हे दान तिथीनुसार करावे, असं केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.

हेही वाचा -

  1. यंदा नवरात्रीत पालखीत बसून येणार दुर्गा माता; शुभ की अशुभ? - Durga Devi Vahan 2024
  2. शारदीय नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व; पहिल्या दिवशी देवीला परिधान करा 'या' रंगाची साडी - Navratri 2024 Colours
  3. यंदा नवरात्रीत पालखीत बसून येणार दुर्गा माता; शुभ की अशुभ? - Durga Devi Vahan 2024

Last Updated : Oct 1, 2024, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.