बुलावायो ZIM vs PAK 3rd ODI Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना आज गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळं हा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
Ahead of the decisive third ODI against Zimbabwe, Pakistan lose pacers to injury 👀#ZIMvPAK https://t.co/PZVMo7Vm00
— ICC (@ICC) November 27, 2024
दोन्ही संघाला मालिका जिंकायची संधी : पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेनं DLS पद्धतीचा वापर करुन पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं दमदार पुनरागमन करत दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. आता तिसरा वनडे सामना जिंकून झिम्बाब्वे संघ मालिकेवर कब्जा करु इच्छितो. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला तिसरा वनडे जिंकून मालिकाही जिंकायची आहे. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तानच्या दिग्गजांना विश्रांती : पाकिस्तानचा संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना सहा सामन्यांच्या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे, झिम्बाब्वेवर विजय मिळविण्यासाठी पुरेशी आहे. झिम्बॉब्वे संघाकडून क्रेग एर्विन वनडे सामन्यात संघाचं नेतृत्व करणार आहे. अनुभवी अष्टपैलू शॉन विल्यम्ससह प्रमुख खेळाडू सिकंदर रझा याच्या समावेशामुळं त्यांची फळी मजबूत झाली आहे आणि त्यांना पाकिस्तानला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे.
CENTURY OFF JUST 5️⃣3️⃣ BALLS 🎉@SaimAyub7 slams the joint third-fastest 💯 for Pakistan in ODIs 💥#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/fdWY317TTu
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात एकूण 64 वनडे सामने झाले. यात पाकिस्ताननं 55 सामने जिंकत एकहाती वर्चस्व राखलं आहे. तर झिम्बाब्वे संघानं 6 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एका सामना टाय झाला आहे.
सॅम अयुबनं रचला इतिहास : पाकिस्तान क्रिकेट संघानं दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. या सामन्यात पाकिस्तान संघाची प्रत्येक चाल बरोबर होती. गोलंदाज आणि फलंदाजांनी संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. झिम्बाब्वेनं पाकिस्तानला विजयासाठी 146 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे सॅम अयुबच्या झंझावाती शतकामुळं पाकिस्ताननं सहज गाठलं. अयुबशिवाय अब्दुल्ला शफीकनं 32 धावांचं योगदान दिलं. सॅम अयुबनं डावाच्या सुरुवातीपासूनच लयीत दिसला आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर त्यानं आक्रमण कायम ठेवलं. त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. त्यानं झपाट्यानं धावा केल्या आणि अवघ्या 53 चेंडूत शतक पूर्ण करुन आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढं फक्त शाहिद आफ्रिदी आहे.
Saim Ayub smashes unbeaten 💯 as Pakistan draw level in the ODI series 💥#ZIMvPAK: https://t.co/yqnhEa1aL9 pic.twitter.com/HkADq4euT4
— ICC (@ICC) November 26, 2024
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना, 24 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- दुसरा वनडे सामना, 26 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- तिसरा वनडे सामना, 28 नोव्हेंबर, दुपारी 1:00 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं होणार?
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना आज, गुरुवार, 28 नोव्हेंबर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. याची नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.
The @SaimAyub7 storm helps Pakistan cruise to an emphatic 🔟-wicket win in the second ODI! 🙌
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
The series decider will take place on Thursday 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/73srWTUF5H
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचे प्रसारण झाल्याची कोणतीही माहिती नाही. तथापि, झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान वनडे मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे संघ : क्रेग एर्विन (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जॉयलॉर्ड गॅम्बी, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा माफोसा, तदिवनाशे मारुमनी, ब्रँडन मावुता, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्डन, रिकान मायडर्स, डिओन मायडर्स. विल्यम्स.
पाकिस्तान संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसिबुल्लाह (यष्टिरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद इरफान खान, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज दहनी, तय्यब ताहिर.
हेही वाचा :