ठाणे Ram Mandir Prana Pratishtha Ceremony : येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या नगरीमध्ये श्रीरामाच्या नव्याने बांधलेल्या भव्य मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशात राम भक्तीची लाट पसरली आहे. माजी खासदार संजीव नाईक आणि रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यातील प्रति शिर्डी मानल्या गेलेल्या साईबाबा मंदिरात (Sai Baba Mandir Thane) 25 टन लाडू तयार करण्यात आले आहेत. हे लाडू ठाणे जिल्हा आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना आणि देवळामध्ये वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचं आज मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांमध्ये राम भक्तीची लाट : अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' (Ramayan) ही मालिका अत्यंत प्रसिद्ध झाली होती. सदर मालिकेचे प्रसारण सुरू होताच रस्ते ओस पडत होते. तसेच सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. सर्वत्र वातावरण राममय आणि भक्तीमय झालेले त्यावेळी पाहायला मिळत होते. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मधील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्तानं असेच काहीसं वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये राम भक्तीची लाट पसरली आहे. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करून सर्वत्र राम मंदिराचं चित्ररथ फिरत असल्याचं दिसत आहे.
हा सोहळा गोड व्हावा म्हणून लाडू वाटप : प्रतिष्ठापना सोहळा सर्वांसाठी आणखी गोड व्हावा या कारणास्तव रामसेवक माजी खासदार संजीव नाईक आणि रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं वर्तक नगर साईबाबा मंदिरात 25 टन लाडू तयार करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडू तयार करून ते ठाणे जिल्हा आणि नवी मुंबई मधील मंडळे, मंदिरे आणि नागरिकांमध्ये वाटण्यात येणार आहे.
हेही वाचा -