- मेष (ARIES) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणं आवश्यक आहे. वैचारिकदृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
- वृषभ (TAURUS) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. वाणीच्या प्रभावानं इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल व मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानानं फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
- मिथुन (GEMINI) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई आणि स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. प्रवाही पदार्थांपासून सावध राहावे लागेल. मानसिक ताण राहील.
- कर्क (CANCER) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज एखाद्या घटनेमुळं आपलं मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.
- सिंह (LEO) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. मानसिक दृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य़ यशस्वी होईल.
- कन्या (VIRGO) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्यानं आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.
- तूळ (LIBRA) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च होईल.
- वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्यानं एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट, मानसिक चिंता ह्यामुळं त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात.
- धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. प्राप्तीत वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
- मकर (CAPRICORN) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र आणि संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. मात्र अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून सावध राहावं लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळं समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
- कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्यानं काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. करमणुकीसाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल. संततीची मात्र चिंता निर्मण होईल.
- मीन (PISCES) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश व प्रसिद्धी वाढेल.
हेही वाचा -