मेष Horoscope 21 September 2024 : आजच्या दिवसाची सुरुवात आपण स्फूर्तीनं आणि उत्साहानं कराल. मित्र आणि सगे सोयरे यांच्या येण्या जाण्यानं घरातील वातावरण आनंदाचं राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामं सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.
वृषभ : आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्यानं आपलं मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.
मिथुन : आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबीक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल आणि त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्यानं संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी आणि संतती यांच्याशी सुसंवाद राहिल्यानं दाम्पत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.
कर्क : आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचं नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख - शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामं शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.
सिंह : आज स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपलं मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अडचणी आल्यानं नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचं नियोजन कराल.
कन्या : आज आपण एखादं काम हाती घेणं हिताचं ठरणार नाही. बाहेरच्या खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रूपासून सावध राहा. आग आणि पाणी या पासून जपून राहावं. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती ह्यामुळे संकट ओढवेल.
तूळ : आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौज - मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. उंची वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दाम्पत्यसुख आणि वाहनसुख मिळेल. प्रकृती आणि मनःस्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाल.
वृश्चिक : आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्यानं अनेक कामं हातावेगळी कराल. अपूर्ण कामं तडीस जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढवणार नाही.
धनू : आज आपण संततीचा अभ्यास आणि स्वास्थ्य यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशानं आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. साहित्य, लेखन आणि कला या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद - विवाद किंवा चर्चा यात भाग घेऊ नका.
मकर : आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणं संभवते. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येऊ शकता.
कुंभ : आज आपण तना - मनानं प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र आणि स्वजनांच्या सहवासानं आपलं मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.
मीन : आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामं पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचं वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचं स्वास्थ्य सुद्धा आपण चांगलं टिकवून ठेवाल.