- मेष (ARIES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्यानं संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्यानं कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकावेत. पैसा खूप खर्च होईल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
- वृषभ (TAURUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज खंबीर विचारांमुळं आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने आणि मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल. धनलाभाची अपेक्षा करू शकता.
- मिथुन (GEMINI) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे-सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावं लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळं ते संबंध सांभाळा. मान-प्रतिष्ठेची हानी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खास शौक-मजा व मनोरंजन यावर खर्च होईल. बुद्धी शांत ठेवून वागावे लागेल.
- कर्क (CANCER) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्यानं आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. प्रवास आणि विवाहाचे योग आहेत. प्रणयाच्यादृष्टीनं दिवस अनुकूल आहे. उत्तम वैवाहिक सुखाचा आनंद मिळेल.
- सिंह (LEO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळं आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल. आजचा दिवस जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. कला व क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखविण्यासाठी दिवस उत्तम आहे.
- कन्या (VIRGO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. शरीर व मन एकदम स्वस्थ राहील.
- तूळ (LIBRA) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहावं. ईश्वराची भक्ती व गाढ चिंतन शक्ती मनाला शांती देईल.
- वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. दांपत्य जीवनात सुखद क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट व धनलाभ होईल.
- धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी-व्यवसायात उन्नती व मान-सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असेल.
- मकर (CAPRICORN) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन, साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळं शारीरिक थकवा व ऊबग येईल. संततीच्या प्रश्ना संबंधी चिंता निर्माण होईल. वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याबरोबर चर्चेत भाग न घेणे हेच हितकर होईल.
- कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्यानं घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
- मीन (PISCES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.
हेही वाचा -