ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या लोकांना मिळेल शनिदेवाचा आशीर्वाद; वाचा राशी भविष्य - Today Horoscope

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 12:11 AM IST

मेष : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज सांसारिक बाबींपासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. या विचारांमुळं एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. असं असलं तरीही बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अन्यथा काही वाद होऊ शकतात. हितशत्रूंचा त्रास होईल. शक्यतो नवीन कार्यारंभ आज करू नये. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे आणि आनंदाचे असल्याचं आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्‍या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.

मिथुन : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश आणि कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.

कर्क : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता आणि उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. शक्यतो प्रवास आणि नवीन कार्याचा आरंभ टाळावा.

सिंह : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळं मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार याच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचे चांगलं सहकार्य मिळेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

तूळ : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळं आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. व्यवहारात हटवादीपणा सोडल्यास परिणाम सकारात्मक मिळतील. कुटुंबीयांशी वादविवाद टाळा. प्रकृतीकडं लक्ष द्या. आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा-समाधानाचे वातावरण राहील. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीनं आनंद होईल. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे.

धनू : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. उक्ती आणि कृती यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. एखादा अपघात संभवतो. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. प्रकृती सुद्धा बिघडू शकेल. शांतता मिळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील.

मकर : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सगे-सोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. सहल-प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल.

कुंभ : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळं आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगलं सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान प्राप्त होतील. मित्र आणि कुटुंबीयांसह आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. त्या कामातून लाभ होतील.

मीन : आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका आणि मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. प्रवास यशस्वी होतील. व्यापारी बंधूंना व्यापारात अडचणी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम : करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा - Devi Ambabai Rathotsav
  2. देशभरात आज साजरी होतेय हनुमान जयंती,समर्थ रामदासांनी स्थापित केलेले अकरा मारुती कुठे आहेत? - Hanuman Jayanti 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.