ETV Bharat / spiritual

'या' राशींना प्रणयाराधनेसाठी अनुकूल दिवस, आर्थिक अडथळेही होतील दूर ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य - Horoscope 1 September 2024 - HOROSCOPE 1 SEPTEMBER 2024

Horoscope 1 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात.

Horoscope 1 September 2024
आजचं राशीभविष्य (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 7:39 AM IST

मेष Horoscope 1 September 2024 : आज आपलं मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचं बोलणं किंवा वागणं यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीतीबरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचं स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालवताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

वृषभ : आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्यानं आपण स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला आणि साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडं चांगलं लक्ष राहील. मित्रांसह प्रवास ठरवाल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. आवडीचं भोजन मिळेल. नशिबाची साथ लाभेल.

मिथुन : आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा होईल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबीक वातावरण आनंदाचं राहील.

कर्क : आज आपणास शारीरिक आणि मानसिक सौख्य मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात आणि उल्हासात जाईल. आपलं मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे.

सिंह : आज मनास चिंता लागून राहिल्यानं स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावानं किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊल टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. वाणी आणि व्यवहार यात संयम व विवेक राखावा.

कन्या : आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थतेबरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात आणि नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्यानं पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्यस्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल.

तूळ : आज आपली कामं सहजतेनं पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्यानं आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापाऱ्यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगलं राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल.

वृश्चिक : आज आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचं जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचं नकारात्मक वागणं आपणास हताश बनवेल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटं येतील. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका.

धनू : अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावं. सरकारविरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणानं वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण - तंट्यापासून दूर राहा.

मकर : आजचा दिवस कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिचं आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ आणि मान - सन्मान यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास व एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल.

कुंभ : आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबीयांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. घरात आनंद व उत्साहाचं वातावरण राहील.

मीन : आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.

हेही वाचा :

  1. उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic
  2. कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.