ETV Bharat / politics

राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर

आज (4 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यामुळं आता कोणकोणामध्ये लढत होणार हे स्पष्ट झालंय.

Maharashtra Assembly Election 2024
महायुती आणि महाविकास आघाडी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 18 hours ago

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. ती आता वेळ संपल्यामुळं कोण कुठे जागा लढवणार? कुठल्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत? आणि कोण अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. याचं चित्र स्पष्ट झालय.

कोणी घेतला उमेदवारी अर्ज मागे? : राज्यातील काही दिग्गज नेत्यांनी बंडखोरी केली होती. यात मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. याचबरोबर मुंबईतील सर्वात चर्चेतील विधानसभा मतदारसंघ म्हणजे माहीमचा. या ठिकाणी आता तिरंगी लढत होणार आहे. कारण शिवसेना (शिंदे पक्ष) सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यासह कोल्हापुरात मधुरीमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. राज्यात कोणी अर्ज मागे घेतले आणि अजूनही निवडणूक लढवण्यावर कोण ठाम आहे? पाहूयात.

'हे' बंडखोर निवडणूक लढवण्यावर ठाम : माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर निवडणूक लढल्यावर ठाम आहेत. यामुळं अमित ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीस गेले होते. मात्र राज ठाकरेंनी भेट दिली नाही. त्यामुळं येथे आता तिरंगी लढत होणार आहे. तर बीडमध्ये शिवसंग्रामच्या ज्योती मेटे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपाच्या स्नेहा पाटलांचा अर्ज कायम आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचे शांताराम मोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

'येथे' होणार चौरंगी लढत : बीडच्या आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. भाजपा बंडखोर भिमराव धोंडे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. तर माजलगावमध्ये रमेश आडसकरांची बंडखोरी कायम आहे. तर दुसरीकडं पुण्यात पर्वतीमधून आबा बागूल यांची काँग्रेसमधून बंडखोरी कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन तावरे यांची बंडखोरी कायम आहे. कसब्यातून काँग्रेसचे कमल व्यवहारे हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. शिवाजीनगरमधून काँग्रेसचे मनीष आनंद यांची बंडखोरी कायम आहे.

महायुतीत बंडखोरी : इंदापुरातून प्रवीण माने (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी), पुरंदरमधून संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मावळमधून बापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), जुन्नरमधून आशा बुचके (भाजपा), शरद सोनवणे शिवसेना (शिंदे पक्ष), खेड आळंदीतून अतुल देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी), आणि भोरमधून किरण दगडे पाटील (भाजपा), कुलदीप कोंडे शिवसेना (शिंदे पक्ष) तसंच नांदेड उत्तर मध्य येथून महायुतीत बंडखोरी कायम आहे.

'या' उमेदवारांनी घेतली माघार

  1. मधुरीमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा
  2. गोपाळ शेट्टी- भाजपा, बोरीवली
  3. स्वीकृती शर्मा- शिवसेना शिंदे पक्ष, अंधेरी पूर्व
  4. सूरज सोळुंके- शिवसेना शिंदे पक्ष, उस्मानाबाद
  5. मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे, उस्मानाबाद
  6. विजयराज शिंदे- भाजपा, बुलढाणा
  7. किशोर समुद्रे- भाजपा, मध्य नागपूर
  8. जयदत्त क्षीरसागर - अपक्ष बीड
  9. जगदीश धोडी - शिवसेना शिंदे पक्ष, बोईसर
  10. अशोक भोईर - बहुजन विकास आघाडी, पालघर
  11. अमित घोडा - भाजपा, पालघर
  12. तानाजी वनवे - काँग्रेस, नागपूर पूर्व
  13. तनुजा घोलप - अपक्ष, देवळाली
  14. मदन भरगड - काँग्रेस, अकोला
  15. प्रशांत लोखंडे - शिवसेना शिंदे पक्ष, श्रीरामपूर
  16. सुहास नाईक - काँग्रेस, शहादा तळोदा
  17. विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार
  18. सुजित झावरे पाटील- अजित पवार पक्ष, पारनेर
  19. जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला
  20. नाना काटे - अजित पवार, चिंचवड
  21. बाबुराव माने - शिवसेना ठाकरे पक्ष, धारावी
  22. मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा
  23. विश्वजीत गायकवाड - भाजपा, लातूर
  24. संदीप बाजोरिया - शरद पवार पक्ष, यवतमाळ
  25. हेमलता पाटील - काँग्रेस, नाशिक मध्य
  26. उदय बने - शिवसेना ठाकरे पक्ष, रत्नागिरी
  27. अंकुश पवार - मनसे, नाशिक मध्य
  28. राजेभाऊ फड - अजित पवार पक्ष, परळी
  29. कुणाल दराडे - शिवसेना ठाकरे पक्ष, येवला
  30. जयदत्त होळकर - शरद पवार पक्ष, येवला
  31. किरण ठाकरे - भाजपा, कर्जत खालापूर
  32. रुपेश म्हात्रे - शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-भिवंडी पूर्व
  33. संगीता वाझे - राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष-मुलुंड
  34. मिलिंद कांबळे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-कुर्ला
  35. अविनाश लाड - काँग्रेस, रत्नागिरी
  36. प्रतिभा पाचपुते - भाजपा, श्रीगोंदा
  37. दिलीप माने - काँग्रेस, सोलापूर
  38. अविनाश राणे - शिवसेना शिंदे पक्ष, अणुशक्तीनगर
  39. संगिता ठोंबरे - भाजपा, केज
  40. राजू परावे - शिवसेना शिंदे पक्ष, उमरेड
  41. अब्दूल शेख - अजित पवार पक्ष, नेवासा
  42. धनराज महाले - शिवसेना शिंदे पक्ष, दिंडोरी
  43. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे - भाजपा, सांगली
  44. रणजीत पाटील - शिवसेना ठाकरे पक्ष, परंडा
  45. नरेश अरसडे - अजित पवार पक्ष, काटोल
  46. सुबोध मोहिते- अजित पवार पक्ष, काटोल
  47. राजश्री जिचकार- काँग्रेस, काटोल
  48. वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी, काटोल
  49. संदीप सरोदे - भाजपा, कोटोल
  50. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांची माघार
  51. दौंडमध्ये महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश. अजित पवार पक्षाचे वीरधवल जगदाळे यांची माघार.
  52. गुहागरमधून भाजपाच्या संतोष जैतापकर यांची माघार
  53. गडचिरोलीमध्ये भाजपाच्या देवराव होळीचा उमेदवारी अर्ज मागे
  54. रायगड - अलिबागमधून ठाकरे पक्षाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार

हेही वाचा -

  1. कोल्हापुरात महाविकास आघाडीला धक्का; अखेरच्या क्षणी मधुरिमा राजे यांचा उमेदवारी अर्ज मागे, सतेज पाटील भडकले
  2. मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचं कारण काय? फायदा कुणाला मविआ की महायुतीला?
  3. बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत; त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.