ETV Bharat / politics

अधिकृत उमेदवारांसाठी 'एबी' अर्ज का महत्त्वाचा?, या अर्जात असते आणखी एका उमेदवाराचे नाव - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. तर राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला 'एबी अर्ज' म्हणजे काय? हे जाणून घेऊयात.

Maharashtra Assembly Election 2024
उमेदवारांसाठी 'एबी' अर्ज महत्त्वाचा (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2024, 10:58 PM IST

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही निवडणूक पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होते ती 'ए.बी' अर्जानेच. नेमका हा अर्ज काय असतो? याबाबत अनेकांना माहिती नसते. पक्षाने निवडणूक आयोगाला सुचवलेले उमेदवाराचे नाव असं वाटतं असलं तरी, त्यामधे एक विशेष बाब असते. ती म्हणजे एखाद्या पक्षाने दिलेल्या या पत्रात उमेदवाराचा संपूर्ण तपशिलासह आणखी एका उमेदवाराचे नाव दिलेले असते. तर राज्यसभा निवडणुकीत 'ए.ए' तर विधानपरिषदेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना 'बी.बी' अर्ज दिला जातो.

ए.बी अर्ज उमेदवारासाठी महत्त्वाचा : लोकसभा निवडणूक असो की, विधानसभा प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून ज्याला एबी फॉर्म मिळतो तोच अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरला जातो. हा अर्ज मिळवण्यासाठी अनेक उमेदवार पक्षाकडं मोठी मोर्चेाबांधणी करतात. एबी अर्ज म्हणजे दोन वेगवेगळे अर्ज निवडणूक विभागाकडं सादर केले जातात. त्यात पहिला 'ए' हा अर्ज सादर करताना, यामध्ये एखाद्या राजकीय पक्षातर्फे अधिकृत उमेदवाराचं नाव, राष्ट्रीयत्व, जात, त्याचं आणि कुटुंबीयांचं उत्पन्न, उमेदवार विरोधात दाखल गुन्हे, खटले यांचा तपशील नमूद केलेला असतो. या 'ए' अर्जावर पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याची माहिती डॉ. सतीश ढगे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना राजकीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे (ETV Bharat Reporter)

'बी' अर्जावर असतो हा महत्त्वाचा तपशील : राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला 'बी' हा अर्ज देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या अर्जावर अधिकृत उमेदवाराची माहिती, पक्षाची माहिती, तो राष्ट्रीय आहे का स्थानिक? याबाबतचा तपशीलासह पक्ष चिन्ह नमूद केलेले असते. त्याचबरोबर अधिकृत उमेदवाराची माहितीसह एका अन्य पर्यायी उमेदवाराची माहिती त्यात नमूद केलेली असते. निवडणूक लढवताना पहिल्या अधिकृत उमेदवाराची अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर, 'बी' अर्जावर दिलेल्या दुसरा उमेदवार अधिकृत म्हणून नोंदवता यावा याबाबची त्या अर्जात माहिती नमूद केलेली असते. त्यावर पक्षाचा शिक्का, अध्यक्ष किंवा सचिवांची स्वाक्षरी असते.

अपक्ष उमेदवार देखील होऊ शकतो अधिकृत : 'एबी' अर्ज दिल्यानंतर एखादा उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून नोंदवला जातो. मात्र, यात अनेक उमेदवार अपक्ष म्हणून अर्ज करतात. तेव्हा ते फक्त 'ए' अर्ज निवडणूक आयोगाला सादर करतात. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला जर एखाद्या राजकीय पक्षाने त्याला 'बी' अर्ज दिला तर, तो पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून नोंदवला जाऊ शकतो. ऐनवेळी काही अडचण झाल्यास किंवा अपक्ष उमेदवार हा योग्य उमेदवार असल्याचा जर एखाद्या पक्षाला वाटलं तर ते शेवटच्या क्षणाला त्याला आपला अधिकृत उमेदवार म्हणून नाव नोंदवू शकतो. त्याचबरोबर एकाच पक्षातर्फे एकापेक्षा जास्त उमेदवारांना 'एबी' अर्ज दिल्यास त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारीच योग्य तो निर्णय घेतात. तर राज्यसभा निवडणुकीत उमेदवाराला 'ए.ए' तर विधान परिषद निवडणुकीत 'बी.बी' हा अर्ज सादर केला जातो.

हेही वाचा -

  1. काँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; खासदाराची बहीण रिंगणात, वाचा संपूर्ण यादी
  2. राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये फाईट, वाचा संपूर्ण यादी
  3. धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसह 'या' दिग्गजांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; शरद पवार आणि राज ठाकरेंची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.