ETV Bharat / politics

महात्मा गाधींच्या कर्मभूमीत मतदानाला सुरुवात, भाजपाच्या रामदास तडस यांनी केलं मतदान, म्हणाले... - Wardha Lok Sabha Contituency - WARDHA LOK SABHA CONTITUENCY

Wardha Lok Sabha Contituency : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय. भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.

Wardha Lok Sabha Contituency
महात्मा गाधींच्या कर्मभूमीत मतदानाला सुरुवात, 24 उमेदवारांचा भवितव्य पणाला; भाजपाच्या रामदास तडस यांनी केलं मतदान, म्हणाले...
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 9:22 AM IST

Updated : Apr 26, 2024, 9:42 AM IST

महात्मा गाधींच्या कर्मभूमीत मतदानाला सुरुवात

वर्धा Wardha Lok Sabha Constituency : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालंय. वर्धा लोकसभा मतदारसंघात 16 लाख 82 हजार 771 मतदार हे आज आपला नेता निवडण्यासाठी उत्साहानं मतदान करत आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी थेट लढत ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशीचं होताना दिसत आहे.

विजयाची मोदी गॅरंटी : वर्धा लोकसभा मतदारसंघतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. सकाळी देव दर्शन आटोपून थेट मतदान केंद्रात दाखल झाले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी विजयाची 'मोदी गॅरंटी' असल्याचा विश्वास व्यक्त केला.

भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनी केलं मतदान

16 लाख 82 हजार मतदार निवडणार आपला नेता : वर्धा जिल्हात एकूण 16 लाख 82 हजार 771 मतदार आहेत. यात 8 लाख 58 हजार 439 पुरुष तर 8 लाख 24 हजार 318 महिला उमेदवार आहेत. तर 14 तृतीयपंथीय उमेदवार आहेत. संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 11 हजार 786 आहे. 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 25 हजार 22 आहे. वर्धा जिल्ह्यात सुरळीत मतदान व्हावं यासाठी एकूण 1 हजार 997 मतदान केंद्र असणार आहेत.

भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत : वर्धा लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरु झालंय. या मतदारसंघात 24 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पुन्हा एकदा रामदास तडस यांना संधी देण्यात आलीय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अमर काळेंना उमेदवारी देण्यात आलीय.

ऊन वाढल्यानं मतदानावर परिणाम होण्याची शक्यता : वर्धा लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे सरासरी 58 टक्के मतदान झालं होतं. यंदा या टक्केवारीत वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात तीव्र ऊन पडत असल्यानं तापमान वाढीचा फटका मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जबाबदारी अधिकारी, कर्मचारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केलाय.

मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था : मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, प्रतीक्षा शेड, वैद्यकीय किट, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअर सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्यानं प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड असतील. तसंच मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्यक देखील उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान सुरू; राहुल गांधी, ओम बिर्ला, पप्पु यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला - Lok Sabha Election Phase 2
  2. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज मतदान, कोणते उमेदवार आहेत रिंगणात? - lok sabha election 2024

Last Updated : Apr 26, 2024, 9:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.