ETV Bharat / politics

भंडारा-गोंदिया मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५६.८७ टक्के मतदान - Bhandara Gondia Lok Sabha

Bhandara-Gondia Lok Sabha : राज्यातील शेवटचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालीय. या मतदारसंघात दोन्ही मुख्य उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

Bhandara-Gondia Lok Sabha
राज्यातील शेवटच्या मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा 'भंडारा'; भाजपा आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 10:28 AM IST

Updated : Apr 19, 2024, 6:22 PM IST

भाजपा आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भंडारा Bhandara-Gondia Lok Sabha : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालीय. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून भंडारा-गोंदिया मिळून एकूण 2133 मतदान केंद्र आहेत. तर यात 41 महिला मतदान केंद्र आहेत. एकूण 18 उमेदवार या मतदारसंघात रिंगणात असून खरी लढत भाजपाचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात आहे. तसंच भंडारा-गोंदिया मिळून एकूण 18 लाख 27 हजार 187 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सकाळपासून मतदानाला सुरुवात : देशात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानात भंडारा-गोंदिया लोकसभेचा समावेश आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आणि सकाळपासूनच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या लोकसभा क्षेत्रात एकूण 6 तालुक्यांचा समावेश असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव हा नक्षल प्रभावित तालुका येतो. म्हणून इथं सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. उर्वरीत गोंदिया, भंडारा, तुमसर, साकोली आणि तिरोडा तालुक्यात सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार आहे. सध्या तापमान खूप वाढल्यानं याचा मतदानावर कोणताही परिणाम होऊ नये, या दृष्टीनं मतदान केंद्रांवर तात्पुरते शेड उभारले गेले आहेत. तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

एकूण मतदार किती : भंडारा-गोंदियामध्ये एकूण 18 लाख 27 हजार 187 मतदार आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील 9 लाख 97 हजार मतदार असून यापैकी 4 लाख 87 हजार 399 पुरुष तर 5 लाख 95 हजार 519 महिला मतदार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात 8 लक्ष 30 हजार 265 मतदार असून यापैकी 4 लाख 1 हजार 43 पुरुष तर 4 लाख 2 हजार 213 महिला मतदार आहेत. तसंच गोंदिया जिल्ह्यात 9 आणि भंडारा जिल्ह्यात 5 असे एकूण 14 तृतीय पंथी मतदार आहेत.

दोन्ही उमेदवारांचा विजयाचा विश्वास : काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सपत्नीक जिजामाता माध्यमिक विद्यालयांमध्ये मतदानाचा अधिकार बजवलाय. "तानाशाही शासनाला उलथून फेकण्यासाठी मतदार मला निवडून देतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल," असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही आज सपत्नीक महाराष्ट्र नूतन शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला. "लोकशाहीचा पर्व आहे, त्यामुळं प्रत्येक व्यक्तींनी घरातून निघून आपला मतदानाचा हक्क पूर्ण करावा," असा आवाहन त्यांनी या वेळेस केलंय. "उन्हाचे दिवस असल्यामुळे लोकांनी सकाळी लवकर घरातून निघून आपला हक्क पूर्ण करण्याचे आवाहन केलंय. मी केलेल्या पाच वर्षांचं काम आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षाच्या कामाची पावती म्हणून मतदारराजा मला नक्कीच निवडून देईल. ही निवडणूक आम्ही जिंकू," असा विश्वास त्यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. नागपूर आणि रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात; 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Nagpur Lok Sabha Constituency

Last Updated : Apr 19, 2024, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.