ETV Bharat / politics

अजित पवार यांच्या 'राष्ट्रवादी'ला बालेकिल्ल्यात खिंडार? माजी नगरसेवकांनी दिला बंडाचा इशारा - Vidhansabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

Vidhansabha Election 2024 : आगामी विधानसभेत योग्य न्याय मिळाला नाही, तर बंड करून आम्ही आमची भूमिका मांडू. अजित पवारांनी मित्रपक्ष भाजपाकडे आग्रह धरून ही जागा आपल्याकडे घ्यावी. अन्यथा आम्ही वीसपेक्षा जास्त नगरसेवक पर्यायी मार्ग घेऊन निवडणूक लढवू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिलाय.

Vidhansabha Election 2024
अजित पवार (Source - ETV Bharat)

पुणे Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिपंरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे या चार नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन बंडाचा एल्गार करणार असल्याचं सांगितलं.

योग्य न्याय मिळाला नाही, तर आम्ही... : भाजपासोबत अजितदादा पवार यांनी युती केल्याने महायुतीची ताकद वाढली, पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यानं चिंचवड विधानसभेत बंडाची घडी पडल्याचं दिसत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी सांगितलं की, चिंचवड विधानसभा मतदार संघातून अजित पवार गटाला उमेदवारी मिळावी, अशी आमची मागणी आहे. भाजपामध्ये मोठी धुसफूस आहे. चिंचवड विधानसभेच्या ठिकाणी प्रखरपणे आमची भूमिका असल्यानं ही पत्रपरिषद आयोजित केली आहे. या विधानसभा निवडणुकीत योग्य न्याय मिळाला नाही, तर आम्ही आणि इतर वीस नगरसेवक बंड करून आम्ही आमची भूमिका मांडू. अजित पवारांनी मित्रपक्ष भाजपाकडे आग्रह धरून ही जागा आपल्याकडे घ्यावी. अन्यथा आम्ही वीसपेक्षा जास्त नगरसेवक पर्यायी मार्ग निवडून निवडणुक लढवू." लवकरच संगनमतानं निर्णय घेत, नवा चेहरा चिंचवड विधानसभेत दिसेल व लवकरच तो जाहीर केला जाईल, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

माजी नगरसेवकांनी दिला इशारा (Source - ETV Bharat Reporter)

भाजपाचं काम करणार नाही : "यावेळी चिंचवड विधानसभेत भाजपाचं काम करणार नाही," असं चारही नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. "आम्हाला न्याय मिळाला नाही तर, 2009 सालाप्रमाणे पुन्हा एकदा चिंचवड विधानसभेला अपक्ष आमदार पाहावयास मिळेल," असं मोरेश्वर भोंडवे म्हणाले.

हेही वाचा

  1. "राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोय..."; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Supriya Sule on Devendra Fadnavis
  2. उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर? ठाकरेंची ससेहोलपट होणार; सत्ताधाऱ्यांचा दावा - Uddhav Thackeray
  3. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची 'मोठा भाऊ' होण्याची महत्त्वाकांक्षा, अमित शाह आज भाजपा पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात करणार 'चार्ज' - Kolhapur assembly election

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.