ETV Bharat / politics

अमित शाह आज कोल्हापुरात; पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, विधानसभेचे फुंकणार रणशिंग - Amit Shah Visit Kolhapur - AMIT SHAH VISIT KOLHAPUR

Amit Shah Visit Kolhapur : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या बैठकीत अमित शाह विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील.

Amit Shah Visit Kolhapur
अमित शाह (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 5:07 PM IST

कोल्हापूर Amit Shah Visit Kolhapur : लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्यामुळं भाजपानं आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात येत आहेत. या दौऱ्यात ते पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक घेणार आहेत.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र बघेल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेतली जाणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Source - ETV Bharat Reporter)

असा असेल दौरा : भाजपाकडून या बैठकीची जय्यत तयारी करण्यात आलीय. या संपूर्ण तयारीची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच खासदार धनंजय महाडिक यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अमित शाह आज सायंकाळी कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. तेथून ते अंबाबाई मंदिरात दर्शनसाठी येतील. त्यानंतर ते महासैनिक दरबार हॉल येथं होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यानंतर रात्री दिल्लीला रवाना होतील.

सहकाराच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचं राजकारण सुरूय. लोकसभा निवडणुकीच्या काळातही अमित शाह यांनी एक दिवस थांबून कोल्हापुरात मोर्चेबांधणी केली होती. त्यानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरणही बदललं. ही बाब लक्षात घेऊन भाजपानं निवडणूक प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातूनच करण्याचा निर्णय घेतलाय.

आठशे पोलिसांचा फौजफाटा तैनात : मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आठशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. शहरातील वाहतूक मार्गांमध्येही बदलण्यात करण्यात आलाय. महासैनिक दरबार हॉलमध्ये गृहमंत्री शाह यांच्या मेळाव्यादरम्यान धैर्यप्रसाद चौक ते लाईन बझार या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 8 उपअधीक्षक, 19 पोलीस निरीक्षक, 75 सहायक पोलीस निरीक्षक तसंच उपनिरीक्षक आणि 702 अंमलदारांचा फौजफाटा तैनात असणार आहे.

हेही वाचा

  1. उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर? ठाकरेंची ससेहोलपट होणार; सत्ताधाऱ्यांचा दावा - Uddhav Thackeray
  2. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची 'मोठा भाऊ' होण्याची महत्त्वाकांक्षा, अमित शाह आज भाजपा पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात करणार 'चार्ज' - Kolhapur assembly election
  3. नाशिक विभागात मित्रपक्षांच्या जागांवर भाजपाची नजर, अमित शाह आज आखणार रणनीती - Amith Shah Nashik visit updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.