हिंगोली : काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या वणी येथे उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली होती. या तपासणीचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी शूट केला होता. या तपासणीवरुन त्यांनी सत्ताधाऱयांवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगा आणि हेलिकॉप्टरची तपासणी तुन्ही करणार का? असा सवाल ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱयांना केला होता.
अमित शाहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी : आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली. याबाबतचा व्हिडिओ अमित शाह यांनी सोशल मीडियावर शेयर करत विरोधकांवर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे हिंगोली येथे आले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.
आज महाराष्ट्र की हिंगोली विधानसभा में चुनाव प्रचार के दौरान चुनाव आयोग के अधिकारियों के द्वारा मेरे हेलिकॉप्टर की जाँच की गई।
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2024
भाजपा निष्पक्ष चुनाव और स्वस्थ चुनाव प्रणाली में विश्वास रखती है और माननीय चुनाव आयोग द्वारा बनाए गए सभी नियमों का पालन करती है।
एक स्वस्थ चुनाव… pic.twitter.com/70gjuH2ZfT
उद्धव ठाकरेंना टोला : "भाजपा निष्पक्ष निवडणुका आणि पारदर्शक निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. तसंच निवडणूक आयोगानं बनवलेल्या सर्व नियमांचं पालन आम्ही करतो. आपण सर्वांनी निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिलं पाहिजे. जगातील सर्वात मजबूत लोकशाही ठेवण्यासाठी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे," असं आवाहन अमित शाह यांनी जनतेसह नेत्यांनाही केलं. तसंच यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला.
ठाकरेंनी विचारले होते प्रश्न : निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे राज्यात दौरे करत आहेत. प्रचार ठिकाणी पोहचल्यावर आतापर्यंत तीनवेळा ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. तपासणी करतानाचे तीन व्हिडिओ त्यांनी शेयर केले होते. तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची ठाकरे यांनी शाळाही घेतली. "तुम्ही कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या? त्यात काय आढळलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या बॅग तपासणार का? सत्ताधारी नेत्यांची तपासणी करणार का?" असे विविध प्रश्न उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही व्हिडिओ पोस्ट करत आमच्याही बॅगा आणि हेलिकॉप्टरची तपासणी होत असल्याचं सांगितलं होतं.
हेही वाचा