मुंबई Ashish Shelar on Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) हे मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. "अमित शाह हे लालबागचा राजासुद्धा गुजरातला घेऊन जातील," अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर भाजपा नेत्यांकडून त्यांना सडेतोड उत्तरं दिली जात आहेत. यावर बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना 125 वर्षाची गणेशोत्सवाची परंपरासुद्धा खंडित केली. त्या दरम्यान त्यांनी लालबागच्या राजालाही बसू दिलं नाही. याबाबत जनतेच्या मनात अद्याप राग कायम आहे."
गणेशोत्सवाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली : याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "संजय राऊत यांनी स्वतःच्या अज्ञानाचा सार्वजनिक कार्यक्रम आता बंद केला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असताना, त्यावर टीका करताना राऊतांची जीभ खूपच वळवळली हे उभा महाराष्ट्र बघत आहे. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री नव्हते किंबहुना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते तेव्हापासून ते सातत्यानं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत."
लालबागचा राजासुद्धा बसला नाही : "लालबागच्या राजाला कोण कुठे पळवून नेईल किंवा गुजरातला नेईल हे बोलण्यापूर्वी तुम्ही हे विसरताय की, तुमच्याच पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना 125 वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली. लालबागचा राजासुद्धा बसला नाही, तेव्हा तुमचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. लालबागच्या राजाच्या भक्तांना व गणेशोत्सव मंडळांना टाळ लावण्याचा कुहेतू हा तुमचा होता. हे कदाचित तुम्ही विसरला असाल म्हणून आठवण करून देतोय. त्यावरचा राग अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून गेलेला नाही," असा खरपूस समाचार आशिष शेलारांनी संजय राऊतांचा घेतला.
कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे : "शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे कळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शंभर वर्षे लागतील, असं आपण म्हणालात. राऊत साहेब, कुणाच्या डोक्यात किंवा घरात काय सुरू आहे, यामध्ये घुसण्याची तुमची सवय आहे. एक कार्यकर्ता, स्वयंसेवक आणि नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम हे महाराष्ट्राला पुढची कित्येक वर्ष पुढे नेणाऱ्या गतीचं आहे. त्यामुळं कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे हे बघण्याची वृत्ती फडणवीस यांचीसुद्धा नाही आणि भाजपाचीसुद्धा नाही. दुसऱ्यांच्या घरात झाकणं हे तुमची वृत्ती आहे," असा टोला आशिष शेलारांनी लगावला.
हेही वाचा -