ETV Bharat / politics

उद्धव ठाकरेच 'मविआ'चे स्टार प्रचारक, ठाकरेंच्या सभांना राज्यभरात मागणी - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Uddhav Thackeray News : लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात प्रचाराचा धुमधडाका सुरू असताना महाविकास आघाडीच्या वतीनं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या सभा घेतल्या जात आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांची अन्य नेत्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या सभा अधिक व्हाव्यात, अशी मागणी आहे. त्यामुळं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यापेक्षाही महाराष्ट्रात ठाकरे यांनाच अधिक पसंती दिली जातेय.

Uddhav Thackeray is a star campaigner of congress
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 3:19 PM IST

मुंबई Uddhav Thackeray News : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तीन टप्प्यांच्या प्रचारानंतर आता शेवटच्या दोन टप्प्यातील प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून या स्टार प्रचारकांच्या सभा आपापल्या मतदारसंघात व्हाव्यात यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या वतीनं प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील या प्रमुख नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांनी सभांची धुरा सांभाळली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभा : महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतंय. तसंच गेल्या काही महिन्यात मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या विरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेचं स्वागत केलं जातंय. त्यामुळं आपल्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी, यासाठी केवळ ठाकरे गटाचेच नव्हे तर महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे उमेदवार देखील आग्रही आहेत. त्यामुळंच अमरावती, धुळे, सोलापूर, पुणे इथल्या उद्धव ठाकरे यांच्या सभा नियोजित नसतानाही त्यांना काँग्रेसच्या उमेदवारांच्या आग्रहाखातर सभा घ्याव्या लागल्या, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी सांगितलं.

सभेच्या मागणीत वाढ : राज्यातील उरलेल्या दोन टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीत विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांनी राहुल गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना अधिक पसंती दिली असून मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे. त्यामुळं आता उरलेल्या दोन टप्प्यात मुंबई, नाशिक, पालघर या पट्ट्यात उद्धव ठाकरेंच्या जास्तीत जास्त व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर येत्या 17 मे रोजी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. मी नकली तर तुम्ही XXXX ; पंतप्रधानांवर बोलताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली - Lok Sabha Election 2024
  2. टेम्पोमध्ये पैसे देतात हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना पलटवार - Congress On PM Modi
  3. राहुल गांधींचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह बसमधून प्रवास, आश्चर्यचकित झालेल्या प्रवाशांनी घेतले सेल्फी - Rahul Gandhi travels in rtc bus

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.