ETV Bharat / politics

भाजपाला पोरंच होत नाही, म्हणून नकली संतान मांडीवर घेतली..., उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात - Uddhav Thackeray - UDDHAV THACKERAY

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळं प्रचाराला वेग आलाय. आज नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) चांगला समाचार घेतला.

Uddhav Thackeray On PM Narendra Modi
उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 10:57 PM IST

नाशिक Uddhav Thackeray : भाजपाला पोरंच होत नाही, म्हणून त्यांना सगळी नकली संतानं म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवर घ्यावे लागले. 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत केला. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला.

राजकारणात भाजपाला पोरंच होत नाहीत : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) चांगला समाचार घेतला. सध्या चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय. पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपाला पोरंच होत नाहीत, म्हणून त्यांना नकली संतान,आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे.

सात पिढ्यांची वंशावळ तुम्हाला देतो : हिंदुहृदयसम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरी देखील काही पावटे,आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात.आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे, या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत, माहीत नाही. यांची इथपर्यंत मजल गेली की, हिंदुहृदयसम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी तुम्हाला माझं बर्थसर्टिफेक तुमच्याकडं मागितलं नाही, तेवढी तुमची लायकीही नाही. तुम्ही कुणी ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलय. मी माझी सात पिढ्यांची वंशावळ तुम्हीला देतो, तुम्ही तुमची दाखवा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला.

मोदींच्या मेंदूवर परिणाम : पंतप्रधान मोदी यांच्या मनावर एवढा ताण पडलाय, मध्ये कोणीतरी सांगितलं की, ते झोपतच नाहीत. झोपलं नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखं बोलायला लागतात. मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना का म्हणतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केलाय.

हेही वाचा -

  1. कांद्यावरुन मोदींविरोधात तरुणांची भर सभेत घोषणाबाजी; पंतप्रधान मोदी मात्र उद्धव ठाकरेंवर बरसले - pm narendra modi
  2. हुकूमशहांचं डिपॉझिट जप्त करणारा विजय हवा : उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Uddhav Thackeray On Pm Modi
  3. अदानीचा पीएम सोबत फोटो म्हणजे त्यांची पार्टनरशिप का? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Wadettiwar On Ghatkopar Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.