ETV Bharat / politics

कोणीही आयुष्याचा आणि सत्तेचा अमरपट्टा घेवून आलेला नाही-उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौर्‍यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहरातील जवाहरचौकामध्ये संवाद सभा पार पडली. यावेळी बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं कौतुक केलं.

Uddhav Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis And this time he appreciated Rajan Salvi
राजापूरमधील सभेत उध्दव ठाकरेंचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर शरसंधान; तर आमदार राजन साळवींचं केलं कौतुक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 9:45 PM IST

राजापूरमधील सभेत उध्दव ठाकरेंचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर शरसंधान; तर आमदार राजन साळवींचं केलं कौतुक

राजापूर (रत्नागिरी) - उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमदार राजन साळवी मिंधे गटामध्ये गेले नाही. त्यामुळे त्यांच्यामागं ईडीची चौकशी लावली. मग सत्ताधारी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड मिंधेंकडे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) करोडो रूपये असल्याचं सांगतात. तर मिंधेच्या घरी ईडीची धाड का पडत नाही? इच्छुक म्हणून राजापूर मतदारसंघामध्ये जे सध्या खर्च करीत आहेत, त्यांच्यावर ईडीची धाड का नाही?", असा खोचक सवाल त्यांनी केला.

स्वतः वेड पांघरून सार्‍यांना वेडं करायचं : पुढं ते म्हणाले की, "ईडीच्या चौकशीमध्ये राजन यांच्या मालमत्तेच्या मुल्यांकनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली खुर्ची यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे दैवत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले वडील आहेत. अशापद्धतीनं दैवत, आई-वडीलांची कोणी किंमत करतं का? कोणीही आयुष्याचा आणि सत्तेचा अमरपट्टा घेवून आलेला नाही. बदलत्या काळाप्रमाणे सत्ताबदल झाल्यानंतर किंमत करणार्‍यांचे काय होईल? देशभरात सत्ताधार्‍यांच्या कारभाराचे चटके बसत आहेत. मात्र, स्वतः वेड पांघरून सार्‍यांना वेडं करायचं आणि पुन्हा सत्तेत यायचं असं चालू आहे."

मला राजन साळवी यांचा अभिमान : "आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची गेल्या काही महिन्यांपासून ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “मी राजनची पाठ थोपटायला आलो आहे’ अशा शब्दामध्ये त्यांना पाठींबा दिला. संकटाच्या काळात कोण साथ देतो, यावरून आपलं कोण आणि परकं कोण हे कळते. संकटाच्या काळात राजन साळवी यांनी साथ दिली. त्यामुळं आम्हाला राजन साळवी यांचा अभिमान आहे."

...तर मी तुझ्या दर्शनाला परत येईन : "कोण कसा वागतोय याचा लेखाजोगा देव ठेवत असतो. तुम्ही सर्वांनी साकडं घातलं आहे, मी पुन्हा मुख्यमंत्री होवो. पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आताही नाही. पण जे धर्माच्या नावाने पापं करताहेत, त्यांचा पूर्ण नायनाट कर असं साकडं मी धुतपापेश्वर चरणी घातलं आहे. पापं करणारी जी माणसं आहेत त्यांना राजकारणातून कायमचं नष्ट करून टाकलं पाहिजे. देव आपलं ऐकल्याशिवाय राहणार नाही. तसंच मी परत नक्की येणार, मी पुन्हा येईन असं म्हटलं जायचं तसं नाही. भवानीशंकरा हे देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं वरिष्ठ दूर कर, मी तुझ्या दर्शनाला परत येईन", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला.

  • व्यासपीठावर रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, कुडाळचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. कलम ३७०; न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, पण काश्मिरी पंडितांच्या सुक्षेची हमी गरजेची, पाकव्याप्त काश्मीरही परत आणा - उद्धव ठाकरे
  2. Thackeray vs Shinde : राज्य सरकार घटनाबाह्य, यावरच बुलडोजर फिरवण्याची गरज- खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. Uddhav Thackeray : एक-एक फोडण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.