ETV Bharat / politics

"...अन्यथा आम्हीच निवडणूक आयोगावर कारवाई करू"; उद्धव ठाकरे कडाडले - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Uddhav Thackeray On Vinod Tawde
उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 10:50 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास बाकी असताना, नालासोपारा येथे भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीनं केला. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व पक्षाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "जर विनोद तावडे पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर आला असला तर, हा व्हिडिओ निवडणूक आयोगानं बघायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनेी दिली.

...नाही तर निवडणूक आयोगावर कारवाई : "सोमवारी अनिल देशमुखांचे डोके आपोआप फुटले. मी आज तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो, तिकडं माझी बॅग चेक केली. त्यामुळं हे जादूचे पैसे आले कुठून? आणि कोणाचे आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच निवडणूक आयोगानं कडक कारवाई केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.

आरोपी फरार होता कामा नये : पैसे वाटल्याच्या प्रकरणावरून विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता ते म्हणाले की, "गुन्हा दाखल झालाय तर ठीक आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी पळून जाता कामा नयेत. पैसे वाटल्याच्या प्रकरणात काही आरोपी फरार झाले आहेत, अशी माझ्याकडं ऐकीव माहिती आहे. अर्थात माझ्याकडं कोणतेही पुरावे नाहीत. तुमच्याकडं व्हिडिओ असतील तर समोर द्यावे. परंतु, या प्रकरणात निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आरोपी पळून जाता कामा नयेत. कारण कायदा सर्वांना सारखा असेल तर त्या कायद्याची आता अंमलबजावणी होणे गरजेचे आहे."

सरकार कसं पाडलं याचा पुरावा : "विनोद तावडे जर पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ असेल आणि त्यात ते पैसे वाटत असताना सापडले असतील तर, याच्या आधी त्यांनी सरकारं कसं पाडलं याचा हा स्पष्ट पुरावा आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विनोद तावडेंवर खोचक टीका केली. "कदाचित पैसे वाटल्याचं हे भाजपा आणि मिंधेंचं गँगवॉरही असू शकतं. भाजपानं हे घडवून आणलं असावं. नाशिकमध्येही गँगवॉर घडलं आहे. याचे तुमच्याकडं व्हिडिओ आहेत की नाहीत मला माहिती नाहीत. पण हे पैसे वाटल्याचं प्रकरण भाजपाचे अंतर्गत गँगवॉर असू शकतं," असं ठाकरे म्हणाले.

नोट जिहाद आहे का? : "भाजपा, मिंधे आणि अजित पवार यांनी 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा दिला. यानंतर आता पैसे वाटतानाचा हा नोट जिहाद आहे का? असा संशय यायला लागलाय. कारण "बाटेंगे और जितेंगे" असं ते करत आहेत. त्यामुळं हे पैसे वाटून नोट जिहाद करण्याचा प्रकार आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा -

  1. मला राज्यमंत्रीपद अन् पहिल्यांदा आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केलं, शंभूराज देसाईंची खदखद
  2. "गुजराती माणसं आणून बसवायला मराठी माणूस मेला का?" उद्धव ठाकरेंचा घणाघात
  3. "भाजपा आणि गद्दारांचं तण उखडून गुजरात, गुवाहाटीला फेकून द्या"; उद्धव ठाकरेंचा प्रहार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.