ETV Bharat / politics

"तुम्ही खुनी आहात, कुठल्या तोंडानं मतं मागणार?"; सुप्रिया सुळेंचा सुनील टिंगरेंवर निशाणा - Supriya Sule On Sunil Tingre

खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. पोर्शे कार अपघात प्रकरणी ही टीका करण्यात आली.

Supriya Sule On Porsche Car Accident
खासदार सुप्रिया सुळे (File PHoto)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 4:39 PM IST

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार टीका केली.

एक आई म्हणून सरकारला विचारणार जाब : वडगावशेरी मतदारसंघातील लोहगाव येथे सुनील खांदवे-मास्तर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. यानंतर झालेल्या कार्यक्रमात सुळे यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली. कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडानं मतं मागणार? त्यांच्या दोन्ही हातावर खून आहे. हे लोकं गुन्हेगार आहेत आणि म्हणतात मी काही केलं नाही. पोलीस स्टेशन, ससून रुग्णालयात कोणी फोन केले? हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, मृतांची आई हक्क मागते. पोर्श कार अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर, एक आई म्हणून सरकारला जाब विचारते."

सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)

आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला दिली : "पोर्शे कार अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी रक्त बदलण्याचं पाप केलं. तसेच आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला दिली. पोर्शे कारने खून केलेल्या निष्पाप दोन जणांच्या आई-वडिलांचे अश्रू पुसायला तुम्ही जाणार आहात का?" असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना विचारला. "मृतांच्या आईला न्याय देण्यासाठी मी वडगावशेरीच्या आमदाराविरुद्ध जंग जंग पछाडून न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा प्रवृतीना घरी बसविण्याची जबाबदारी वडगावशेरीमधील नागरिकांची आहे," असं म्हणत सुळे यांनी टिंगरे यांना इशारा दिला.

हेही वाचा -

  1. "राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोय..."; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Supriya Sule on Devendra Fadnavis
  2. सुप्रिया सुळेंनी 'त्या' कार्यक्रमाला जायला नको होतं; मंत्री मुश्रीफांची समरजीत घाटगेंवर टीका - Hasan Mushrif
  3. केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात.... - Supriya Sule On Amit Shah

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.