ETV Bharat / politics

मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्य; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका - Sunil Tatkare on Vijay Shivtare

Sunil Tatkare on Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढलीय. यावरुन आता सुनील तटकरेंनी विजय शिवतारेंवर टीका केलीय.

मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्ये; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 9:15 AM IST

सुनील तटकरे

मुंबई Sunil Tatkare on Vijay Shivtare : शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी "बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. वेळ पडल्यास अपक्ष लढण्यापेक्षा कमळ चिन्हावर लढण्यास तयार आहे," असंंही त्यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर "माणसाच्या मनस्थितीवर परिणाम झाला की अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांना प्रत्युत्तर दिलंय.

एक दोन दिवसात जागावाटप : यावेळी बेलताना तटकरे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. आगामी लोकसभा निवडणूक असो किंवा इतर निवडणुका असो, आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल, त्या ठिकाणी आम्हाला महायुतीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळेल. तसंच ज्या ठिकाणी महायुती घटक पक्षांचा उमेदवार उभा असेल, त्या ठिकाणी आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून खंबीरपणे त्याच्या पाठीमागं उभं राहणार आहे. जागा वाटपाचा कोणताही तिढा राहिलेला नसून 80 टक्के जागावाटप पूर्ण झालंय. महायुतीत समन्वय आहे. शिवसेना पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उमेदवारांच्या नावावर एक झालं असून अखेरची लिस्ट दिल्लीत ठरेल. येत्या एक ते दोन दिवसात लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. "विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकी संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काल सुद्धा आमची बैठक झाली. प्रचाराचं नियोजन, घटक पक्षाला विश्वासात घेणं, या दृष्टीनं चर्चा झाली," असही तटकरे म्हणाले.

मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडं लागलंय. कारण या मतदारसंघात दोन पवारांमध्येच निवडणूक पार पडणार आहे. मात्र यात आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी एन्ट्री घेतल्यामुळं अधिक चुरस वाढल्यचं पाहायला मिळतंय. विजय शिवतारे यांच्या मनधरणीचं काम शिवसेना तसंच महायुतीतील घटक पक्षांकडून वारंवार केलं जातंय. मात्र, त्याला न जुमानता विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मतदारसंघात विजय शिवतारे यांनी दौरे सुरु केले असून ते दोन्ही पवार कुटुंबावर विधान करत आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरेंनी "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर योग्य निर्णय घेतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच "माणसाच्या मनस्थितीवर परिणाम झाला की अशी वक्तव्ये बाहेर येतात," असं म्हणत सुनील तटकरे यांनी विजय शिवतारेंवर टीका केलीय.

राजकारणाची समीकरणं बदलत असतात : "मनसे महायुतीसोबत येण्याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. एक दोन दिवसात मनसेनं बैठक बोलावली असं एकण्यात आलंय. राजकारणातील समीकरणं बदलत असतात. तसंच शरद पवार जे वक्तव्य करतील, त्यावर मी बोलणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केलंय. "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग, न्यायालय यांनी शिक्कामोर्तब केलं असून यावर जास्त न बोलता आमची बाजू महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे," असं ते म्हणाले. "आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली," अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिलीय.

हेही वाचा :

  1. "शिवसेना नाही तर भाजपानं उमेदवारी द्यावी", निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम - Vijay Shivtare News
  2. विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.