ETV Bharat / politics

Sudhir Mungantiwar : "अदानीला मोठं करण्याचं काम कोणी केलं? इतिहासाची पानं चाळा", सुधीर मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीला खडा सवाल - Sudhir Mungantiwar On MVA

Sudhir Mungantiwar On MVA : भाजपाचे जेष्ठ नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रविवारी (17 मार्च) मुंबईत पार पडलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेवरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तसंच विरोधकांकडून भाजपावर करण्यात आलेल्या टीकेलाही त्यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Sudhir Mungantiwar Criticized  Mahavikas Aghadi  Leaders Rahul Gandhi Uddhav Thackeray Sharad Pawar over there Speech
सुधीर मुनगंटीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:27 PM IST

सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडीवर टीका

मुंबई Sudhir Mungantiwar On MVA : भाजपाचे जेष्ठ नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी (17 मार्च) मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेवरून काँग्रेस तसंच विरोधकांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. अदानीला मोठं करण्याचं काम कोणी केलं?, असा खोचक सवाल मुनगंटीवार यांनी मविआ ला केला. तसंच राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार मोदी चले जाव म्हणताय. मात्र, याचा अर्थ मोदी चले आओ, असा होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

स्वतः अदानीच्या पाठीशी उभं राहायचं, पण बदनामी आमची करायची : काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार उद्योगपती अदानी यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "विरोधकांना देवानं कमी स्मरणशक्ती दिलीय, किंवा हे विरोधक आपल्या सोयीचं राजकारण करताय. लोकसभेत सुद्धा अदानी यांचं नाव घेऊन मोदींवर टीका करण्याचं काम विरोधक करत आहेत. यांनी अदानींचा इतिहास कधी बघितलाय का? 1993 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी अदानीला 10 पैसे मीटरनं कच्छची जमीन देऊन मदत केली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री छबिलदास मेहता जे शरद पवार चे अतिशय घनिष्ठ मित्र होते. ते 1995 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुद्रापूर टेंडर तेव्हा काढले."

अदानी आणि तुमची घनिष्ठ मैत्री : पुढं ते म्हणाले की, "जेव्हा राजस्थान मध्ये काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा अदानीला 45 हजार कोटींचं सोलारचं टेंडर देण्यात आलं. त्यावर काही प्रश्न नाही. महाराष्ट्रात 2 वर्ष 8 महिने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे एक अभद्र सरकार होतं. तेव्हा एमएसईबी मधून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी हजारो कोटी रुपये दिले. तेव्हा अदानी हा मोदीजींचा मित्र नव्हता, तर तो तुमचा घनिष्ठ मित्र होता. म्हणजे दिवसा सभेमध्ये अदानीचं नाव घ्यायचं आणि रात्री अदानी सोबत गप्पागोष्टी करत भोजन करायचं, ही तुमची अतिशय वाईट निती आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका काढल्याच पाहिजेत, यामध्ये काही दुमत नाही. पण स्वतः अदानीच्या पाठीशी उभा रहायचं आणि भाषणामध्ये अदानीच्या नावाचा शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची. सत्तेच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करायचा. जरा इतिहास काढा, अदानीला मोठं करण्याचं काम कोणाच्या राज्यात झालंय हे इतिहासामध्ये शब्द न शब्द फाईल मध्ये लिहिलेलं आहे."

ईव्हीएम वर आरोप हा काँग्रेसचा बालिशपणा : ईव्हीएमवरुन करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ईव्हीएम वर जर का राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केला असेल, तर अशा पक्षाला हजर वर्ष कोणी मतदानास करू नये. शेवटी ईव्हीएम कोणी आणलंय? असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम हे भाजपानं नाही, तर काँग्रेसनं आणलंय, असं मुनगंटीवार म्हणाले. तसंच जर तुम्ही देशाच्या इतक्या मोठ्या विषयावर डोकं साबूत न ठेवता आरोप करत असाल तर हा आरोप भाजपावर नाही, तर तुमच्या स्वतःवर आहे. देशाच्या प्रगतीमध्ये बाधा कशी आणता येईल हेच काम विरोधक करत असल्याची टीकाही मुनगंटीवार यांनी यावेळी केली. तसंच काँग्रेस ही एक कन्फ्युज, गोंधळलेली पार्टी असून माझी जनतेला अतिशय नम्रपणे विनंती आहे की, त्यांनी यापासून सावध राहायला हवं.

जागावाटपावरून आमच्या मध्ये कुठलीही नाराजगी नाही : शिवाजी पार्कवर पार पडलेल्या सभेत शरद पवार यांनी भाजपा चले जाव चा नारा दिला होता. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "शरद पवार जे म्हणत आहे त्याच्या उलट होतं. हे सर्व जनतेला माहित आहे. भाजपा चले जाव म्हणजे संसद मे चले आओ. असा त्याचा अर्थ होतो. शरद पवारांनी चलेजाव म्हटलं म्हणजे संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी चले आओ असा त्याचा अर्थ आहे." तसंच जागावाटपावरून आमच्यात कुठलीही नाराजी नाही. एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतला की, तेरा वैभव अमर रहे मॉं, या भावनेनं आम्ही काम करतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी आम्हाला सांगितलं आहे की, तुटे मन से कोई खडा नही होता, और छोटे मन से कोई बडा नही होता, हे वास्तविक आहे. आता मला सुद्धा लोकसभा लढवण्यास सांगितलं म्हणून मी काय नाराज आहे का? आज मैदानात उतरत आहे. काँग्रेसनं मागची जागा जिंकली. या निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेत भारतीय जनता पार्टीचा विजय होईल यासाठी मी विचारांची तलवार घेऊन निघालोय, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Ashok Chavan On Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं वक्तव्य हस्यास्पद : खासदार अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल
  2. Rahul Gandhi Speech : देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये; राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
  3. Uddhav Thackeray Speech :"खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार", उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.