ETV Bharat / politics

मुंबईत संथगतीनं मतदान... मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - lok sabha election

lok sabha election सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडलं यात मुंबईतील सहा मतदानसंघांचा समावेश होतं. निवडणूत आयोगाच्या ढोबळ कारभारामुळं अनेकांना मतदानापासून मुकावं लागलं

eknath shinde
चौकशी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आदेश (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 8:52 PM IST

मुंबई lok sabha election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. मुंबईत ५८ टक्के मतदान झालयं. पहिल्या चार टप्प्यातील मतांची टक्केवारी पाहिल्यास पाचव्या टप्प्यात सर्वात कमी मतदान झाल्याचं निदर्शनात आलं. मुख्यत: मुंबई येथील अनेक मतदारसंघात मोठा घोळ झालं असल्याची माहिती पुढे आली आहे. यात अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित आणि इतर गैरसोयीमुळं मुंबईकरांना मनस्ताप सहन करावं लागलं. यामुळे निवडणूक आयोगाचा ढिसाळ आणि अनागोंदी कारभार समोर आल्यामुळं मतदाराने संताप व्यक्त केलाय, याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

मतदान केंद्रावर अनेक समस्या डोंगर : मुंबईकरांनी सकाळपासून मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. परंतु अनेक मतदारांची मतदार यादीत नावेच नव्हती यामुळं कित्येक मतदारांना मतदान करण्यापासून मुकावं लागलं. मुंबईसारख्या महानगरीमध्ये असं घडणं ही बाब विचार करण्यासारखी आहे.

मतांवर परिणाम : घाटकोपर, शिवाजीनग, गोवंडी आणि मानखुर्द अशा नावाजलेल्या मतदारसंघात ईव्हीएम मशीन चालत नसल्याचे निदर्शनास आलं काही ठिकाणी चक्क वीज खंडीत झाल्याचा प्रकारही घडल्यामुळं काही वेळासाठी मतदान थांबवल्याच्या घटनासमोर आल्या. यामुळं मतदारांना त्रास सहन करत ताटकळ थांबावं लागलं काही मतदार गैरसोयींमुळ मतदान न करताच माघारी फिरावं लागलं याचा थेट परिणाम मतांवर झाला आहे.

चौकशीचं आदेश : मुंबईतील काही ठिकाण तसचं भिवंडी ठाणे आणि ठाणे कल्याण या लोकसभा मतदारसंघात मतदान अतिशय संथ गतीने मतदान झाल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. तसचं काही राजकी नेत्यांनीही याबाबत तक्रार केली आहे. मतदान केंद्रावर लोकांची गैरसोय होत आहे असा अरोप ठाकरे गटातील प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदत मांडला. यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला व त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरु : उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरु झाले अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मात्र राजकीय टीकेनंतर अनेक मतदान केंद्रावर अतिशय संतगतीनं मतदान सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळालं. याचे व्हिडिओ देखील समोर आले. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले असून, निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ आणि अनागोंदी कारभाराबाबत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा

पालघरमध्ये मतदानादिवशी मतदारांचे हाल; लाखो लोकांची नावं मतदार यादीतून गायब, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप - Palghar Lok Sabha

ठाकरे गटाच्या पोलिंग एजंटचा मतदान केंद्रात मृत्यू, अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर केला 'हा' गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.