ETV Bharat / politics

भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन'; 'हे' आहेत राजकीय क्षेत्रातील चर्चेतील भावंड - Sibling Day 2024 - SIBLING DAY 2024

Sibling Day 2024 : आजचा दिवस भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन' म्हणून साजरा केला जातो. राजकीय क्षेत्रात भावा बहिणींच्या अनेक जोड्या आपला ठसा उमटवत आहेत.

Sibling Day 2024
भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन'; 'हे' आहेत राजकीय क्षेत्रातील चर्चेतील भावंड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 3:09 PM IST

मुंबई Sibling Day 2024 : प्रत्येक नात्याची वैशिष्ट्यं आणि महत्व सांगण्यासाठी काही खास दिवस जगभरात साजरे करण्यात येतात. ज्यात व्हॅलेंटाईन्स डे, मदर्स डे, फादर्स डे तसंच फ्रेंडशिप डे यांसारख्या अनेक 'डेज'चा समावेश आहे. यात अशाच एका विशिष्ट डे चा समावेश आहे, तो म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित 'भावंड दिन' होय. लहानपणापासूनच एकमेकांसोबत असणाऱ्या या भावंडांचं नातं म्हणजे 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना' या पद्धतीचं अनेकवेळा असतं. त्यामुळं अशा या गोड तिखट नात्याचा दिवस देखील जगभरात साजरा करण्याची पद्धत आहे.

काय आहे इतिहास : कोणताही दिवस साजरा करण्यामागं त्याची संकल्पना आणि इतिहास महत्त्वाचा असतो. त्यानुसार या दिवसाचा देखील इतिहास आहे. ज्याबद्दल बहुतांश लोकांना काही माहितीच नाही. क्लॉडिया इवार्ट नावाच्या महिलेनं अगदी लहान वयातच तिचे लाडके भावंड गमावले होते. त्यानंतर तिनं ठरवलं की ती आपल्या भावंडाच्या स्मरणार्थ एक खास दिवस साजरा करेल. त्यानंतर जगात प्रथमच 1995 मध्ये क्लॉडिया इवार्ट यांनी 'भावंड दिन' साजरा केला होता. क्लॉडियानं हा दिवस म्हणजे 10 एप्रिल हा दिवस भावंड दिनासाठी निवडला कारण त्या दिवशी तिच्या लिसेट नामक बहिणीचा वाढदिवस होता. भाऊ-बहिणीचं नातं जपण्यासाठी 1998 पासून अमेरिकेच्या 49 राज्यांमध्ये 'भावंड दिन' साजरा केला जात असला तरी, त्याला अद्याप युएन अर्थात संघराज्याची मान्यता मिळालेली नाही.

  • तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात भावंडांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. मग ते राजकारण असो, सिनेजगत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात भावंडांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. आजच्या दिवसागणिक बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीत अनेक भाऊ-बहिणी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे : राजकारणात सर्वाधित जास्त चर्चेपैकी एक भावा-बहिणींची जोडी म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंकडे बघितलं जातं. हे दोघं चुलत भाऊ बहिण असले तरी त्यांनी तसं जाणवू दिलं नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. त्यात देशात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघाचं हे भावंड प्रतिनिधित्त्व करतात. या निवडणुकीपूर्वी बहिण सुप्रिया सुळे लोकसभेत तर भाऊ अजित पवार हे विधानसभेत असं गणित ठरलेलं होतं. मात्र यावेळी बदललेल्या राजकीय समिकरणांमुळं ही बहिण भावांची जोडी एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरली आहे. त्यामुळं या जोडीची सर्वात जास्त सध्या चर्चा सुरू आहे. आता भावा बहिणींच्या या लढाईत कोण बाजी मारेल हे आगामी काळात स्पष्ट होईलं.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावांची देखील राजकारणात सर्वाधिक चर्चा होत असते. आतापर्यंत हे दोघं एकमेकांच्या विरोधात उभे असायचे. त्यात हे दोघंही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नव्हते. कधी भाऊ बहिणाला तर कधी बहिण भावाला चितपट करत असे. मात्र या लोकसभेत ही बहिण भावाची जोडी एकत्र पाहायला मिळतेय. यापूर्वीच्या निवडणुकींपेक्षा एकदम विरुद्ध चित्र या निवडणुकीत दिसत आहे. पंकजा मुंडे यांना महायुतीनं बीड लोकसभेची उमेदवारी दिलीय. त्यातच आता त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे महायुतीतीलच सदस्य असल्यानं दोघंही एकत्र प्रचार करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास - World Health Day 2024
  2. 'आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिना'निमित्त लहान मुलांना पुस्तक वाचण्याची सवय लावा... - international childrens book day

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.