नागपूर Shyam Manav On Devendra Fadnavis : मला कुणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतरचं मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? असा थेट प्रश्न श्याम मानव (Shyam Manav) यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अडचणीत आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला होता.
अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठीचं देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिज्ञापत्र पाठवले होते, असा गंभीर आरोप केला आहे. याला अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिल्यानंतर आज संपूर्ण दिवसभर या विषयावर राजकारण तापलं आहे.
दिवसभर आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, श्याम मानव सुपारीबाजांच्या नादी लागून माझ्यावर आरोप करत आहेत का? तर यावर श्याम मानव यांनी देखील प्रतिउत्तर दिलं आहे. मला कुणीतरी तरी सुपारी दिली आणि त्यानंतरचं मी आरोप करतो असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? असा प्रश्न श्याम मानव यांनी विचारला आहे.
सुपारी देण्याची क्षमता फडणवीस यांच्याकडे : मला विकत घेण्याची क्षमता कुणामध्येही नाही, तर विकत घेण्याची आणि सुपारी देण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलीच आहे. देशात इमर्जन्सी लादली असताना इंदिरा गांधींचा विरोध मी केला होता. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत काम केलं होतं. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी विचार करून बोललो. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. अनिल देशमुख यांच्याकडं असलेल्या पुराव्याबद्दल खात्री झाल्यानेचं मी बोललो आहे. सरकारवर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो असल्याचं श्याम मानव म्हणाले आहे.
ठाम विश्वास बसल्याने आरोप करत आहे : देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करत असताना तुम्ही पुरावे तपासून बघितलेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर श्याम मानव म्हणाले की, मी जरी पुरावे बघितलेले नाही पण मला ठाम विश्वास बसल्यानेचं मी आरोप केला आहे. तसंच हे आरोप गेल्या पाच महिन्यांपासून करत आहे. आज पत्रकारांची नजर गेली असा चिमटाही त्यांनी काढला.
हेही वाचा -