ETV Bharat / politics

संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut - SHRIKANT SHINDE ON SANJAY RAUT

Shrikant Shinde On Sanjay Raut : "खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फाऊंडेशनमध्ये 500 कोटींचा घोटाळा केलाय," असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. या आरोपाला श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलंय.

Shrikant Shinde On Sanjay Raut
संजय राऊत यांना श्रीकांत शिंदेंचा सल्ला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 3:47 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे

ठाणे Shrikant Shinde On Sanjay Raut : मागील काही दिवसांपासून शांत असलेले श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कारण होतं संजय राऊत (Sanjay Raut) यांचं 'पत्र'. या पत्रावरून राजकीय आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आमचं फाउंडेशन खर्च करेल : खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनवर गंभीर आरोप केलेत. यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला केलाय. "संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत. त्यांनी याचा उपचार घावा, आमचं फाऊंडेशन याचा खर्च करेन," असा टोला शिंदे यांनी राऊतांना लगावलाय. "संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलंय. यावरून त्याचं पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास वाढलाय हे सिद्ध होतंय. मीडियानं देखील कोणाच्या पत्राची दखल घावी आणि कोणाची नाही हे त्यांना समजलं पाहिजं. तसेच सर्व पैसे खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबीयांच्या खात्यात आले आहेत," असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिलं, म्हणजे मोदींवरील त्यांचा विश्वास वाढला आहे. पत्राचाळमधील आरोपी जेलमध्ये जाऊन आलेत, तेच आता पत्र लिहीत आहेत - श्रीकांत शिंदे, खासदार

मागील काही दिवसांपासून श्रीकांत शिंदे आक्रमक : आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेवून अनेक दिवसांपासून संयम ठेवलेले श्रीकांत शिंदे आधी उमेदवारी आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या टीकेमुळं संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. संजय राऊत यांनी सोमवारी श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनवर गंभीर आरोप केले होते. त्याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिलंय.

"चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू" : संजय राऊत यांनी सकाळी 'एक्स'वरुन पोस्ट केली आहे. "श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनमध्ये देणग्यांच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये कसे काय जमा झाले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच "चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र देखील सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत, मिंधे सरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मदाय आयुक्त हिशोब द्यायला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे," असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू; 'श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटींचा घोटाळा,' संजय राऊतांचा गंभीर आरोप - Sanjay Raut Allegations
  2. कल्याणचा गड जिंकण्यासाठी ठाकरेंची मोर्चेबांधणी, विनोद घोसाळकर यांच्यावर दिली जबाबदारी - Lok Sabha Elections 2024
  3. आदर्श ग्राम योजना कागदावर: मुख्यमंत्री पुत्रानं दत्तक घेतलेल्या गावात समस्यांचा 'डोंगर'; 'ईटीव्ही भारत'चा Exclusive रिपोर्ट - MP Shrikant Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.