ETV Bharat / politics

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र - Sharad Pawar On CM Eknath Shinde - SHARAD PAWAR ON CM EKNATH SHINDE

Sharad Pawar On CM Eknath Shinde : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे.

Sharad Pawar On CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 4:02 PM IST

मुंबई Sharad Pawar On CM Eknath Shinde : महाराष्ट्र सरकारनं राज्याच्या दुष्काळातील परिस्थितीबाबत उपाययोजना करण्याची कोणतीही भूमिका घेतली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. पाठपुरावा करून देखील राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळं जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावा लागेल, असा राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून इशारा पवार यांनी दिलाय.

जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. राज्यातील जनतेचे जीवन दुष्काळामुळं अक्षरशः विस्कळीत झालंय. पाणीटंचाईचे मोठं संकट उभे राहिलं असून जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. मात्र, राज्यातील या भीषण परिस्थितीकडं लक्ष वेधून देखील राज्य सरकारकडून कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अशाच प्रकारची परिस्थिती जर राज्यात कायम राहिली आणि राज्य सरकारकडून तातडीनं कोणतेही पावले उचलले नाही तर राज्यातील जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावा लागेल, असा इशारा शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून दिलाय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाकरिता योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा देखील शरद पवार यांनी व्यक्त केलीय.

पत्रात काय आहे? : खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. 24 मे रोजी आपण पत्रकार परिषद घेऊन राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्यासोबतच आपण राज्य सरकारला सहकार्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रित सामोरे जाण्याची स्पष्ट केलं होतं. आपण देखील आदल्या दिवशी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ परतीचा आढावा घेतला. मात्र याला पालकमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री गैरहजर होते. याची आपण दखल घेतली असेलच. मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार अंग झटकून कामाला लागलं नसल्याचं आपल्या निदर्शनास आणून देत असल्याचं पवार यांनी म्हटलंय.

अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट : राज्यातील महत्त्वाचे धरण आटले असून संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ उत्तर महाराष्ट्र, विदर्भला बसली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट अधिकच चिंताजनक बनत आहे. गेल्यावर्षी राज्यात ११०० टँकर होती. मात्र, आता ती 11000 च्या वर गेली आहेत. जनावरांचा चारा आणि पाणी मिळणं कठीण झालं असून राज्यातील पशुधन ही धोक्यात आलंय. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट बनली आहे. त्यांना वाचवण्यासाठी राज्य शासनानं कोणतेही उपाययोजना केली नाही. दुष्काळ परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील राज्य सरकारनं हाती घेतल्या नाही हे दुर्दैवानं नमूद करावा लागत असल्याचं शरद पवार यांनी पत्रात म्हटलंय.

दुष्काळ निवारनासाठी पावलं उचलावी : दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारला कायम सहकार्याची भूमिका आपण घेत आहोत. परंतु या दुष्काळी परिस्थिती जनतेच्या हाल पाहून स्वस्थ राहणं कठीण आहे. या सर्व भीषण दुष्काळ निवारनासाठी राज्यसरकारनं तातडीनं पावलं उचलावी असं आवाहन त्यांनी केलंय. तसेच त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल हे स्पष्टपणे नमूद करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, भाजपानंही भरली हवा - Jayant Patil Congress Joins
  2. जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' कृत्यामुळे भाजपा नेते, कार्यकर्ते आक्रमक; विविध जिल्ह्यात आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न - BJP Vs MLA Jitendra Awhad
  3. "अजित पवारांमध्ये कोणते गुण कमी होते?"; शरद पवारांच्या 'त्या' दाव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल - Lok Sabha Election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.