ETV Bharat / politics

"आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदात रस नाही", मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य - Sharad Pawar - SHARAD PAWAR

Sharad Pawar : महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar
शरद पवार, उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 5:08 PM IST

Updated : Aug 23, 2024, 7:26 PM IST

पुणे Sharad Pawar : राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाबाबत एकमत होत नाहीे, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. "शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा, माझा पूर्ण पाठिंबा असेल," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "आम्हाला राज्याच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे," असं शरद पवार यांनी म्हटलंय.

शरद पवार यांची पत्रकार परिषद (Source - ETV Bharat Reporter)

राज्याच्या सत्तेत परिवर्तन हवं : आज पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, "आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदात रस नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला राज्याच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे. सत्तेत परिवर्तन करून राज्यातील जनतेला उत्तम शासन देणं, ही आमची इच्छा आहे."

बदलापूरमध्ये घडलेली घटना धक्कायक : बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा देण्यात आली आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत धक्कायक आहे. बदलापूर येथे घडलेल्या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. राज्य सरकारनं अशा प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. महाराष्ट्र बंदमध्ये पक्षातील सगळे सहकारी सहभागी होतील. बंद शांततेत पार पडला पाहिजे आणि सर्वांनी यात सहभागी झालं पाहिजे."

बदलापूरच्या आंदोलनात राजकीय सहभाग असल्याचं सत्ताधारी म्हणत आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "यामध्ये कोणीही राजकारण आणलं नाही, आमच्या मनात देखील असं नाही. लहान मुलांवरील अत्याचाराबाबतच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन होतं. त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघू नये, त्या बालिकांवर झालेल्या या घटनेनंतर कोणीही त्याचं राजकारण करू नये, असं मला वाटतं.

कृषी-औद्योगिक विकासात राजकारण कधीच आलं नाही : साखर कारखानदारांना दिलेल्या पैशांबाबत न्यायालयानं सरकारला फटकारल आहे. त्याबाबत शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले, "सहकार चळवळ आणि कृषी-औद्योगिक विकासात राजकारण कधीच आलं नाही. राज्य सरकार एक नीती तयार करते आणि त्यात सगळ्या अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत मिळवून देते, पण आता तसं होताना दिसत नाही. यात राजकारण होत आहे."

झेड प्लस सुरक्षेबाबत प्रतिक्रिया : केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला यावर जास्त बोलायचं नाही. मला अनेक वर्षांपासून राज्यानं ही सुरक्षा दिली आहे. आता केंद्र सरकारकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे. एकूण 3 जणांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांनी सुरक्षा का दिली? याबाबत अधिकारीही स्पष्टपणे सांगू शकलेले नाहीत.

हेही वाचा

  1. मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीत वाद ? ; आता रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य आलं पुढं - Rohit Pawar On Cm Candidate
  2. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांचा राडा ; विधानसभेच्या उमेदवारीवरुन मनसेच्या दोन गटात तुफान हाणामारी - MNS Activist Dispute In Chandrapur
  3. विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच विरोध; 'या' नेत्यानं दिलं आव्हान - Kothrud Assembly Election 2024
  4. पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, कमराबंद चर्चेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ - Maharashtra Politics

Last Updated : Aug 23, 2024, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.