पुणे Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत चीन आणि भारत सीमेवर चिंता व्यक्त केली. येणाऱ्या काळात सीमा प्रश्नांवर तोडगा काढण्याचं प्रयत्न करू, असं म्हटलं होतं. यावर माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार म्हणाले, "हल्ली प्रधानमंत्री जे बोलतात, ते पाहून त्या पदाची प्रतिष्ठा किती ठेवतात, याची शंका येते. त्यांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. चीननं जे अतिक्रमण केलंय, त्यावर त्यांनी काय पाऊल टाकलं हे सांगावं. विरोधी पक्षातील एकही उमेदवार निवडून देऊ नका, असे पंतप्रधानांनी रामटेकच्या भाषणात लोकांना आवाहन केलं. यापूर्वी सर्व पंतप्रधानांनी विरोधी पक्षांचा सन्मान केला."
"बारामती लोकसभेत जनतेनं यापूर्वी मुलाला, वडिलाला आणि लेकीला निवडून दिले. यावेळेस सुनेला (सुनेत्रा पवार) निवडून द्या," असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नुकतेच आवाहन केले. पवारांच्या नावासमोर तुम्ही मतदान करा, असंही म्हणत खासदार सुप्रिया सुळेंना मतदान न करण्याचं सूचित केलं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार एवढाच फरक असल्याचं म्हटलंय. तसंच त्यात चुकीचं काहीच नाही."
अजित पवारांच्या त्या वक्तव्याला काही अर्थ नाही : " माझी भावंडं माझ्या निवडणुकीत कधी फिरले नाहीत. पण आता फिरत आहेत. मी तोंड उघडलं तर अवघड होईल", असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "असं काही नाही. आमच्या कुटुंबातले सगळे लोक माझ्या निवडणुकीपासून प्रचाराला असतात. त्याचबरोबर त्यांच्या कुठला व्यवसाय, काय संबंध आहे, ते सगळं जगजाहीर आहे. त्यामुळं त्या बोलण्याला काही अर्थ नाही."
अशा टीकांमुळं मानसिकता दिसून येते : शाहू महाराज दत्तक पुत्र आहेत, असं वादग्रस्त विधान कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, " मंडलिक काय बोलले माहित नाही. तसंच अनेक राजघराण्यांमध्ये दत्तक घेणं हे काय नवीन नाही. पण हा सगळा प्रकार म्हणजे राजकारण किती खालच्या पातळीवर चालू आहे, हे दिसतं. शाहू महाराज लोकांसाठी चांगली काम करत आहेत. अशा टीकांमुळं त्यांची (संजय मंडलिक) मानसिकता दिसून येते, अशी टीका शरद पवार यांनी केली.
हेही वाचा :