ETV Bharat / politics

शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; अजित पवारांच्या नावाची पाटी फोडली - शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

NCP Political Crisis : शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर लावण्यात आलेला अजित पवारांच्या नावाचा बोर्ड शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकलाय.

Sharad Pawar News
शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 9:00 AM IST

शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

पुणे NCP Political Crisis : गुरुवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निर्णय घेत पक्षाचं चिन्ह आणि नाव हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभर अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. तर या निर्णयावर राज्यातील विविध पक्षातील नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिलीय. पक्षाची पुढील रणनीती आखण्यासाठी पुण्यात शरद पवार गटानं राष्ट्रवादी भवन इथं तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील दोन्ही आमदार तसेच बहुसंख्य नगरसेवक हे अजित पवार गटात गेल्यानं मोठ्या संख्येनं फक्त कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर आक्रमक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या नावाची कोनशिला काढली.

कार्यालयात बोलावली पक्षाची बैठक : विधीमंडळातील बहुमत लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं. यानंतर शरद पवार गटानं पक्ष कार्यालयात पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या दोन्ही आमदारांनी अनुपस्थिती लावल्याची पाहायला मिळाली. वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार सुनील टिंगरे हे पूर्वीपासूनच अजित पवारांसोबत होते. मात्र हडपसर विधानसभा मतदार संघातील आमदार चेतन तुपे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ते केव्हा अजित पवारांच्या व्यासपीठावर तर केव्हा शरद पवार गटांच्या व्यासपीठावर दिसत होते. त्यामुळं ते या बैठकीत उपस्थित राहणार का? याकडं सर्वांचेचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र त्यांनी या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली. बैठकीला माजी नगरसेवकांची अनुपस्थिती देखील मोठ्या प्रमाणावर होती. एक ते दोन नगरसेवक सोडले तर सर्वच नगरसेवकांनी या बैठकीकडं पाठ फिरवली.

आमचे नेते शरद पवारच : यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, "आज पक्षाचे कार्यकर्ते हे आमच्या बरोबर आहेत. लवकरच पक्ष आणि पक्षाचे नाव जाहीर होणार आहेत. आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे आमचे नेते शरद पवार आहेत. जरी आज त्यांनी फटाके फोडले असले तरी, हे त्यांचे शेवटचे फटाके होते. आता यापुढं निवडणुकीत आम्ही फटाके फोडणार आहोत आणि राज्यातील जनता ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल."

हेही वाचा -

  1. मोठी बातमी! निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलं 'हे' नाव; तीन नावांचे दिले होते पर्याय
  2. दिवंगत नेत्यांवर टीका करणं चुकीचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका
  3. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.