ETV Bharat / politics

"भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा"; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका - शरद पवार

Sharad Pawar on Narendra Modi : कोल्हापुरात मंगळवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचं लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केलीय.

Sharad Pawar on Narendra Modi
Sharad Pawar on Narendra Modi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 7:04 AM IST

Updated : Feb 21, 2024, 7:37 AM IST

कोल्हापूर Sharad Pawar on Narendra Modi : कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं स्मारक उभारण्यात आलं असून, या स्मारकाचा उद्घाटन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते व शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी शरद पवारांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय.

पानसरेंच्या स्मारकाचं लोकार्पण : नऊ वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेला मंगळवारी नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकरी मोकाट फिरत असून तपास यंत्रणांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अपयश आलंय. मात्र, नऊ वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी गोविंद पानसरे यांच्या सार्वजिक कार्याचं भान ठेवून त्यांच्या हत्येनंतर झालेल्या शोकसभेत त्यांचं स्मारक उभं करण्यात पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महापालिकेनं या स्मारकासाठी 35 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. तर कमी पडणारा 25 लाखांचा निधी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करुन दिला. यातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं स्मारक उभारण्यात आलं असून त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसंच शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी या सोहळ्यास भाकपचे जनरल सेक्रेटरी खासदार डी. राजा, राज्याचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र कानगो, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, मेघा पानसरे उपस्थित होते.

पुरोगामी विचार संपणार नाही : पानसरेंच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर खासदार शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, "हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून पानसरे, दाभोळकर यांच्यावर हल्ला करत पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मात्र, विचाराची संघर्ष करायचा असेल तर विचारानं करायला हवा. मात्र, ज्यांच्याकडे विचार नाही ते अशा प्रवृत्तीनं कायदा हातात घेऊन असा भ्याड हल्ला करू शकतात हे त्याचं उदाहरण आहे. आज प्रतिगामी शक्ती या वाढत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना पुरोगामी विचारांची किंचितसुद्धा आस्था नाही."

पंतप्रधान मोदींवर टीका : "संसदेच्या अधिवेशनात जिथं सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या जातात, देशाच्या धोरणाची चर्चा केली जाते, अशा लोकशाहीच्या मंदिरात देशाचे प्रमुख पंतप्रधान केवळ वीस मिनिटांसाठी येतात. बाकी वेळेस ते सभागृहाकडे पाहत नाहीत. असं असलं तरी ते संसदेच्या पहिल्या दिवशी संसदेच्या पायरीवर साष्टांग नमस्कार करतील व लोकांना काहीतरी वेगळा संदेश देतील. या सर्व गोष्टी ते स्वतःच्या राजकीय विचारांना घेऊन लोकांना धर्माकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सत्तेचा गैरवापर सातत्यानं होतोय. आवाज दाबणे, लेखनावर निर्बंध आले असे प्रकारसुद्धा होत आहेत. अशा प्रतिगामी शक्तींविरुद्ध संघर्ष करण्याची ही वेळ आहे," असंही शरद पवार म्हणाले.

भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा : यावेळी शरद पवारांनी केंद्रीय तपास यंत्रणा व त्यांच्या वापराबाबत देखील भाष्य केलं. "सत्तेचा गैरवापर करुन भाजपाकडून झारखंडमधील मुख्यमंत्र्यांवर काहीच कारण नसताना खोट्या केसेस करून तुरुंगात डांबलं जातंय. दिल्लीत काम करणारे मुख्यमंत्री केजरीवाल हे प्रतिगामी शक्ती विरुद्ध भूमिका मांडत असल्यानं त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधारीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्यांवर ईडी व अन्य संस्थांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न सत्तेतील लोकांकडून होत आहे. यामुळं 'भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा' असे नारे दिले जात असून भाजपाकडून असं चित्र तयार केलं जातंय. हा संघर्ष केवळ निवडणुकांपुरता सीमित नाही तर ज्यांच्या विरुद्ध अन्याय होतो त्यांच्या मागे मोठी शक्ती उभी करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. यासाठी सर्व प्रादेशिक शक्ती एकत्र आणल्या पाहिजेत," असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं, मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत

Last Updated : Feb 21, 2024, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.