मुंबई- राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी राष्ट्रवादीच्या (एसपी) अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्नीसमोर पवारांची ही होती अट : शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले, लग्नाआधी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासमोर एकच मूल असावे, अशी अट ठेवली होती. मुलगा असो मुलगी एकच मूल होईल, ही अट प्रतिभा यांनी मान्य केली. 44 वर्षांपूर्वी एकच मुलगी असण्याचा निर्णय घेणे खूप अवघड होते. पण त्यांनी ते करून दाखवले. खुल्या कुटुंबात जन्मलेल्या सुप्रिया यांना लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. शरद पवार यांनी कधीही सुप्रिया सुळे यांना शिक्षण असो की लग्न यासाठी दबाव निर्माण केला नाही.
Birthday wishes to Rajya Sabha MP and senior leader, Shri Sharad Pawar Ji. I pray for his long and healthy life.@PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2024
कर्करोगावर मात करत राजकीय वाटचाल: 2004 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांना कर्करोग झाल्याचं निदान झाले. ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी भारतातीलच काही डॉक्टरांकडे जाण्याचा शरद पवारांना सल्ला दिला. कर्करोगावर मात करण्याकरिता कृषीमंत्री असताना त्यांना 36 वेळा रेडिएशन उपचार घ्यावे लागले. उपचारासाठी शरद पवार हे सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत मंत्रालयात काम करायचे. दुपारी अडीचनंतर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घ्यायचे. एका डॉक्टरांनी पवारांनी केवळ सहा महिने आयुष्य राहिले, असे सांगितलं. तसेच तंबाखूचे सेवन बंद करण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार यांनी आजाराची काळजी करू नका, असे सांगितले. सहा महिनेच आयुष्य सांगणारे डॉक्टर जिवंत नाहीत, असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले.
शरद पवार यांची अशी आहे राजकीय कारकिर्द
विद्यार्थीदशेतच राजकारणापासून सुरुवात: 1956 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रातील प्रवरानगर येथे गोवा स्वातंत्र्यासाठी निषेध मोर्चा काढला. तरुण वयातच ते राजकारणात सक्रिय झाले. 1958 मध्ये पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चार वर्षांनी पवार 1962 मध्ये पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतरच्या काळात पवारांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. काँग्रेस पक्षात त्यांनी हळूहळू आपले राजकीय वजन वाढविले.
आमदार ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री: 1967 मध्ये शरद पवार 27 वर्षांचे असताना बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नांना वाचा फोडोली. शंकरराव चव्हाण यांच्या 1975-77 च्या सरकारमध्ये शरद पवार गृहमंत्री होते. वयाच्या 38 व्या वर्षी, शरद पवार यांनी जनता पक्षासह सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस (यू) सोडली. ते 1978 मध्ये महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले
संरक्षण मंत्री ते कृषी मंत्री: 1988 मध्ये शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1991 मध्ये शरद पवार पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. 2004 मध्ये ते यूपीए सरकारमध्ये केंद्री कृषीमंत्री झाले.
- 1967 मध्ये ते महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य
- 1972 ते 1974 पर्यंत ते महाराष्ट्र सरकारचे अन्न, गृह, नागरी पुरवठा, प्रसिद्धी, पुनर्वसन, क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
- 1974 ते 1978 पर्यंत ते महाराष्ट्र सरकार अंतर्गत कृषी, गृह, शिक्षण, उद्योग, युवक कल्याण आणि कामगार कॅबिनेट मंत्री
- 1978 ते 1980 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- 1981 ते 1986 पर्यंत ते महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी
- 1982 ते 1987 पर्यंत ते काँग्रेस (एस) चे अध्यक्ष
- 1984 मध्ये ते 8 व्या लोकसभेवर निवडून आले
- 1988 ते 1991 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- 1991 मध्ये ते पुन्हा 10 व्या लोकसभेवर निवडून आले
- 1991 ते 1993 पर्यंत त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी
- 1993 ते 1995 पर्यंत ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
- 1995 ते 1996 या काळात त्यांना महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनवण्यात आले.
सोनिया गांधींना विरोध करत राष्ट्रवादीची स्थापना- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काँग्रेसच्या एका वर्गाला त्यांनी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा होती. पण 1999 मध्ये शरद पवार यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसमधून बंडखोरी केली. त्यांनी पीए संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासोबत 'राष्ट्रवादी काँग्रेस'ची स्थापन केली. 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या. पण निकालानंतर ते पुन्हा एकत्र आले. मात्र, राज्यात युती आणि केंद्रात भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी सरकार आले. 2004 मध्ये वाजपेयी सरकार पायउतार झाले. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. शरद पवार यांनी सुमारे 10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्रीपद सांभाळले.
हेही वाचा-