ETV Bharat / politics

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी खोदले जाणार सहा फुट खोलीचं खंदक; कारण काय? - lok sabha election

PM Narendra Modi Rally : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. त्यात कांदाफेक होण्याच्या शक्यतेनं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यामुळं मैदानाच्या चारही बाजूनं सुमारे सहा फुटाहुन अधिक खोलीचे खंदक खोदण्यात येणार असल्याचं समोर आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 3:43 PM IST

Updated : May 11, 2024, 5:21 PM IST

नाशिक PM Narendra Modi Rally : केंद्र सरकारनं घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा फटका महायुतीला यंदाच्या लोकसभेत बसण्याची चिन्हे आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदार संघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना शेतकरी वर्गाकडून तीव्र विरोध होत असल्याचं चित्र दिसतंय. त्यात 15 मे रोजी दुपारी 1 वाजता नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. त्यात कांदाफेक होण्याच्या शक्यतेनं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 2007 मध्ये नाशिकच्या शेतकऱ्यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर कांदाफेक केली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये, तसंच आंदोलकांची घुसखोरी थांबवण्यासाठी मोदींच्या सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार असून, मैदानाच्या चारही बाजूनं सुमारे सहा फुटाहुन अधिक खोलीचे खंदक खोदण्यात येणार असल्याचं समोर आलंय.

शेतकऱ्यांमध्ये संताप : नाशिक जिल्ह्यात कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांच्या हातातून कांदा गेल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतल्यानं शेतकरी वर्गामध्ये अधिक संताप आहे. यात नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष दिसून येत आहे. काही ठिकाणी तर महायुतीच्या उमेदवारांना गावात प्रवेशही दिला जात नसल्याचं चित्र आहे. केंद्र सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत नसून पिकवलेला माल किती पैशात व कुठं विकायचा याचही स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही. परंतु, सरकार एकतर्फी निर्णय घेऊन मोकळे होतात, अनेकदा नुकसानीत व्यवहार होतो. कांदा लागवडीला लागलेला पैसा सुद्धा निघत नाही. त्यात निर्यात बंदी लादली जाते, कांद्याच्या दरातील घसरण काही वर्षापासून सातत्याने होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. टोमॅटोचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे.

मोदींच्या सभा स्थळी खंदक खोदणार : कांदा व टोमॅटो क्षेत्र असलेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या शेजारी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा किंवा टोमॅटो फेकण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवली आहे. हा प्रकार टाळण्यासाठी भाजपा दाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार पोलीस प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. त्यासाठी सभास्थळावर चारही बाजूंनी मोठे खंदक खोदून बॅरिकेटिंगचं नियोजन आहे. या कामासाठी येणाऱ्या मजुरांची ही लेखी नोंद घेतली जाणार असून, सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचं म्हणणं काय : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मतं किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्काच्या अटी ठेवून निर्यात खुली केल्यास शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला सरासरी 120 रुपये किलो दर आहे. बिनशर्त निर्यात खुली झाली असती तर शेतकऱ्यांच्या हातात 35 ते 40 रुपये पडले असते. चाळीत साठवलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च किमान 25 रुपये असेल आणि वरील प्रमाणे दर मिळाला असता तर 10 ते 15 रुपये प्रति किलो नफा झाला असता. म्हणजे एकरी दीड लाख रुपये पदरात पडले असते. पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना 15 रुपये दर मिळत आहे.

सुरक्षेचं काम पोलीस प्रशासनाचं : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रात ठिकठीकाणी होत आहेत. नाशिकमध्ये देखील पिंपळगाव इथं 15 मे रोजी सभा होत आहे. या सभेसाठी आम्ही फक्त परवानगी मागितली होती. ती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा भाग हा पोलीस प्रशासनाचा आहे. ते त्यांच्याप्रमाणं नियोजन करतील असं भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. मौलवींच्या फतव्यानंतर राज ठाकरेंनी काढला फतवा; म्हणाले.... - Raj Thackeray Pune Sabha
  2. खासदार अमोल कोल्हेंचा मतदानापूर्वी 'मोठा डाव'; केली 'ही' मोठी घोषणा - lok sabha election

Last Updated : May 11, 2024, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.