ETV Bharat / politics

सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे गनिमी काव्यानं दूर करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Satara News

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (28 जानेवारी) सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रतापगडाला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे गनिमी काव्यानं दूर करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

eknath shinde said that encroachments on the forts will be removed with guerilla poetry
किल्ल्यांवरील अतिक्रमणे गनिमी काव्याने दूर करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 10:59 AM IST

सातारा Eknath Shinde News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या रायरेश्वर ते प्रतापगड या गडकोट मोहिमेची सांगता रविवारी (28 जानेवारी) प्रतागपडाच्या पायथ्याशी असलेल्या पारगावात झाली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरनं आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अफझलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण आम्ही थांबवले. मलंगगडदेखील लवकरच मुक्त होईल. सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे गनिमी काव्याने दूर केली जातील."

आरक्षणाची शपथ पूर्ण करूनच आलोय : पुढं ते म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी शपथ दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून घेतली होती. ती पूर्ण करूनच दर्शन घ्यायला प्रतापगडावर आलोय". मुख्यमंत्र्यांनी किल्ले प्रतापगड परिसरातील विकास कामांची पाहणी केली. प्रतापगड जतन, संवर्धनासाठी 100 कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. गडकोट किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

रायरेश्वर-प्रतापगड गडकोट मोहिमेची सांगता : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा 39 वा रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहीमेचा सांगता सोहळा प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. तरुणांना गडकोटांचे महत्त्व कळावे, यासाठी अशा मोहिमा आवश्यक आहेत. रायरेश्वर ते प्रतापगड मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला मानाचा मुजरा असल्याचं मत मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलं. तसंच संभाजी भिडे यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांना लाजवेल असं असून त्यांच्या प्रेरणेतून आजही लाखो तरुण घडत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

  • दरम्यान, यावेळी संभाजी भिडे , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, तसंच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
  2. महालक्ष्मी रेसकोर्स मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन प्रस्तावात; उच्च न्यायालयाचा या घडीला हस्तक्षेपास नकार
  3. 'बाळासाहेब ठाकरे अन् आनंद दिघे प्राणप्रतिष्ठा सोहळा बघत असतील'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.