ETV Bharat / politics

शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात; मुश्रीफांवर सडकून टीका, म्हणाल्या, तुरुंगाच्या भीतीनं... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांची उपस्थिती होती.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
सरोज पाटील यांची हसन मुश्रीफांवर टीका (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 11:00 PM IST

कोल्हापूर : शरद पवार यांच्या बहीण पत्नी सरोज पाटील यांनी कोल्हापूरमधील कागलमध्ये जोरदार भाषण करत समरजीत घाटगे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. शरद पवारांचं वय झालं, पक्ष गेला आणि चिन्ह ही गेलं. मात्र, हताश न होता त्यांनी सगळं उभं केलं. गद्दार लोकांना तुम्ही मत दिली, तर भारतातील लोकशाही संपुष्टात येईल आणि दुसरा ट्रम्प भारतात जन्म घेईल, असं सांगत सरोज पाटील यांनी समरजीत घाटगे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.

महाविकास आघाडी निवडून आलीच पाहिजे : "मी शरद पवार यांना लहानपणापासून पाहिलं आहे. आमचंच रक्त ज्यांच्यात आहे तो ईडीच्या कारवाईला घाबरुन तिकडं गेला आहे. शरद पवारांनी अजित पवारांना लहानाचं मोठं केलं. ते आत्ता पक्ष आणि चिन्ह घेऊन पळून गेले. हे पाहून आम्हाला वाईट वाटलं. महाविकास आघाडी निवडून आलीच पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र आणि देशाचं काहीही खरं नाही. या गद्दार लोकांना तुम्ही मत दिली तर भारतातील लोकशाही संपुष्टात येईल आणि दुसरा ट्रम्प भारतात जन्म घेईल," असं सांगत सरोज पाटील यांनी शरद पवारांचे उमेदवार समरजीत घाटगे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.

प्रचारसभेत बोलताना सरोज पाटील (Source - ETV Bharat Reporter)

मुश्रीफांवर डागलं टिकास्त्र : "शरद पवारांनी हसन मुश्रीफांना काय दिलं नाही? सगळं दिलं तरी भ्रष्टाचार केला. दोन्ही हातांनी खा-खा खाल्लं आणि तुरुंगाच्या भीतीनं पळून जायचं. शरद पवार, जयंत पाटील यांच्यावर कोणता डाग आहे का बघा. हसन मुश्रीफ गाडला जाणार," अशी घणाघाती टीका सरोज पाटील यांनी केली.

हसन मुश्रीफांना शिक्षा देण्याची वेळ आली : "ज्या शरद पवारांनी हातात बोट धरून हसन मुश्रीफ यांना महाराष्ट्र दाखवला. त्यांनी ईडीच्या चौकशीला घाबरून शरद पवारांची साथ सोडली. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. ज्याप्रमाणे युगपुरुष छत्रपती शिवरायांनी धोका देणाऱ्याला शिक्षा दिली होती, तशी तुम्ही हसन मुश्रीफ यांना पराभूत करून त्यांना शिक्षा द्या," असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

हेही वाचा

  1. प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला: धामणगाव मतदारसंघात खळबळ
  2. अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला; 'स्टंटबाजी' असल्याचा भाजपाचा आरोप, MVA चे नेते आक्रमक
  3. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची शेवटची पत्रकार परिषद; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.