ETV Bharat / politics

मोदी यांना 'दंश करणारा साप' म्हणत संजय राऊतांचा 'जहरी' हल्लाबोल; राजकीय वातावरण तापणार? - Sanjay Raut

Sanjay Raut On Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना चक्क सापाशी केली आहे. मोदींचा एकेरी उल्लेख करत ते वारंवार दंश करणारे जहरी साप असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळं या मुद्द्यावरुन आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut has compared Prime Minister Narendra Modi to snake
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 12:09 PM IST

संजय राऊत यांची मोदींवर टीका (reporter)

मुंबई Sanjay Raut On Narendra Modi : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत हे नेहमीच आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करत त्यांना दंश करणारा साप म्हटलंय. मोदींचा उल्लेख 'दंश करणारा साप' असा करत ते वारंवार सर्वांना दंश करत असल्याची टीका त्यांनी केलीय. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.

काय म्हणाले राऊत? : आज (18 मे) मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, "भाजपा, मिंधे गट आणि अजित पवारांचा गट यांचं मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटप करणं आणि धमक्या देणं हेच आहे. अजित पवारांनी बारामतीत कसे पैसे वाटले हे आपण बघितलंय. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून 19 पैशांच्या बॅग कशा उतरल्या ते मी दाखवलं. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये यांनी पोहोचवलेत." तसंच मागं पुढं पोलिसांच्या गाड्या आणि पोलीस संरक्षणामध्ये या पैशांचं वाटप होत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले की, "काल मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी हा प्रकार रंगेहाथ पकडला. निवडणूक आयोग यावर काय करतंय? नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो केला. हा भाजपाचा प्रायव्हेट प्रचाराचा कार्यक्रम होता. त्यामुळं त्यांच्या रोड शो चा खर्च त्यांच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. परंतु, जो पैसा खर्च झाला तो पैसा मुंबई महानगरपालिकेनं खर्च केला. मुंबई महानगरपालिकेनं तब्बल तीन कोटी 56 लाखाचा खर्च यांच्यावर केला. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंबईकरांच्या खिशावर भार टाकला जात असून भाजपाकडून हा पैसा वसूल केला पाहिजे. तसंच त्यांच्यावर काय कारवाई केली हे देखील निवडणूक आयोगानं सांगितलं पाहिजे."

देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार : "देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार आहेत. कोरोना काळात इंजेक्शनचा बेकादेशीर साठा पकडला. तेव्हा देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ करत होते. देवेंद्र फडणवीस चोरीच्या मालाला संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी येतात. इलेक्शन कमिशन भाजपाची गुलाम बनलीय," अशी टीका देखील राऊतांनी केली.

राज ठाकरेंवरही साधला निशाणा : पुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत राऊत म्हणाले की, "राज ठाकरे आज शाखांना भेटी देणार आहेत. पण ते नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? भाजपाच्या की संघाच्या? राज ठाकरेंच्या शाखा कुठे आहेत? राज ठाकरे मोदींच्या चरणी विलीन झालेत. शुक्रवारी मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर गेले. हा बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. नरेंद्र मोदी हे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरती नतमस्तक होण्याचं ढोंग करताय. बाळासाहेबांनी काल मोदींना आशीर्वाद नाही तर शाप दिला. पंतप्रधानांची सापाशी तुलना करत राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचे राजकीय पडसाद पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. संजय राऊत वैफल्यग्रस्त, त्यांनी आधीच पराभव मान्य केला; राऊतांच्या आरोपाला शिंदे गटाकडून प्रतिउत्तर - Jyoti Waghmare On Sanjay Raut
  2. "मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाकरिता हेलिकॉप्टरमधून १२ ते १३ कोटी रुपये नेले, लवकरच..."- संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut news today
  3. "संजय राऊतांची सुरक्षा फक्त १५ मिनिटं हटवाच अन्...."; नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane on Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.