ETV Bharat / politics

"ध्यान-तपस्या करून धमक्या देऊन निवडणुका",... एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut - SANJAY RAUT

Sanjay Raut On Lok Sabha Election Exit Polls : देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर विविध एजन्सींकडून एक्झिट पोलनं आपला अंदाज वर्तवलाय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशांमध्ये भाजपा प्रणित एनडीए सरकार पुन्हा सत्तेत बसणार आहे. यावरुन आता विरोधक टीका करत आहेत.

Sanjay Raut On Lok Sabha Election Exit Polls
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Source reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 2:09 PM IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Source reporter)

मुंबई Sanjay Raut On Lok Sabha Election Exit Polls : मुंबई- एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला 370 ते 390 जागा तर इंडिया आघाडीला 140 ते 160 जागा मिळणार आहेत. "हे एक्झिट पोलचे आकडे ठरवून दिलेले असून ते फ्रॉड आहेत," अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "चॅनलने मतदान केले नाही किंवा एक्झिट पोल कंपन्यांनी मतदान केलेले नाही. कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. एका एक्झिट पोल कंपनीनं राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या आहेत. आता मला असं वाटतयं की, हे सर्व मिळून भारतीय जनता पक्षाला 800 ते 900 जागा देतील. ते शक्य आहे, कारण मोदींनी ध्यान केलं आहे. इतके वेळ ते ध्यानाला बसले. कॅमेरे लावून साधना- तपस्या केली. त्यामुळे 360 - 370 म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानस्थ माणसाला किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागलं असं बोलू शकतो."

फ्रॉड पोल- ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते राऊत म्हणाले, "अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा पोल आहे. गेल्या काही वर्षात ओपेनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरतात. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. हा एक्झिट पोल नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचे आहे. सत्तेमधील पक्ष वरती पैसे देऊन हवे तसे पोल घडवून आणतात. हा आतापर्यंत गेल्या दहा वर्षातला अनुभव आहे. 'पैसा फेको तमाशा देखो' असा पोल आहे. आमचा विश्वास नाही,आम्ही त्याच्यावर बोलणार नाही," असं राऊत म्हणाले.

धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीत- "भारतीय जनता पक्ष या देशात गृह मंत्रालय आणि ते यंत्रणा कशाप्रकारे याच्यावर दबाव टाकते ते सर्वांना माहिती आहे. शनिवारी जयराम रमेश यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक मॅनेजमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकाविलं आहे. या धमक्या कशाकरता आहे, ते मी सांगण्याची गरज नाही. ध्यान-तपस्या करून धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीत."

  • इंडिया आघाडीचे सरकार येणार- पुढे संजय राऊत म्हणाले, "देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळणार आहेत. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे 35 अधिक इतक्या जागा मिळेल," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
  • सहा राज्य परिवर्तन घडविणार-"खासदार सुप्रिया सुळे किमान दीड लाखा मतांनी जिंकणार आहेत. आमच्या शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील. काँग्रेसची उत्तम कामगिरी राहील. देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे राज्य देशांमध्ये परिवर्तन घडवतील," असा दावाही संजय राऊत यांनी केला.
  • कॅमेरे लावून बसावं लागायची गरज नाही-"आम्ही किमान 30 ते 35 जागा जिंकत आहोत. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला. आम्हाला तपस्या आणि कॅमेरे लावून बसावं लागायची गरज नाही, "असे म्हणत भाजपाला टोला लगावला आहे.
  • न्यायालयावरचा दबाव कमी होईल-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज स्वतःला सरेंडर करावे लागणार आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, "कदाचित चार जूनला सरकार बदलेल. त्यानंतर न्यायालयावरचा दबाव कमी होईल. न्यायालय 'सत्यमेव जयते' सत्याचा आधार घेऊन निकाल देईल."

आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल-महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल वक्तव्य केलं होतं की राहुल गांधी यांच्यात देश पंतप्रधानाचा चेहरा पाहत आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, "राहुल गांधी यांच्यामुळे मोदी यांना तपश्चर्या आणि ध्यानधारणा करावी लागली. 4 जूनला लोकसभेचे निर्णय आल्यानंतर पंधरा मिनिटात इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल तो समोर येईल. जनतेची इच्छा आहे की राहुल गांधी यांनी देशाचे नेतृत्व केलं पाहिजे. आम्हालादेखील तेच वाटतं आहे, " असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोण मारेल बाजी, काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? - lok sabha 2024 exit poll
  2. एक्झिट पोलनुसार महायुतीचे राज्यातील ४० जागांचे स्वप्न धुसरचं, महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? - Exit Polls 2024
  3. देशात 'एक्झिट पोल'नुसार मोदींचाच दबदबा; 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का, आता लक्ष अंतिम निकाल - Lok Sabha Election EXIT POLLS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.