ETV Bharat / politics

"दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायची बाकी", रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut - SANJAY RAUT

Sanjay Raut Criticized BJP : शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून काँग्रेस नंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरुन टीका केली आहे.

Sanjay Raut criticized BJP over Ravindra Waikar clean chit
रवींद्र वायकर आणि संजय राऊत (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 3:04 PM IST

मुंबई Sanjay Raut Criticized BJP : शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी मधील भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. ही क्लीन चिट देताना गैरसमजातून रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलय. तसंच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रक्रिया दिली आहे.

कायद्याचं राज्य राहिलंय का : यासंदर्भात मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत असताना राऊत म्हणाले, "आता केवळ दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी राहिलंय. महायुती सरकार सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन आपली ताकद वाढत असल्याचं दाखवतय. आपल्यावर कारवाई होईल म्हणून जे घाबरून पळून गेले त्या सर्वांना आता क्लीन चिट देण्यात येत आहे. मोदी आणि राज्यातील सरकारमध्ये आणखी काय होणार? आता हे कायद्याचं राज्य राहिलंय का?", असा रोखठोक सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

ईडीच्या कारवाईला घाबरून पळून गेले : "आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करून धमकावून त्यांना पक्षात घेतलं. परंतु आमच्यासारखे काही लोक त्यांच्या दबावाला बळी पडले नाहीत. मात्र, काही लोकांचं काळीज उंदराचं आहे. मुख्यमंत्री तसंच अजित पवारसुद्धा याच ईडीच्या कारवाईला घाबरून पळून गेले. भाजपानं त्यांना धमकावून भीती दाखवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले", असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला.

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : पुढं ते म्हणाले, "जर असं असेल तर आमच्यावरील गुन्हे देखील मागे घ्यावेत. आमच्यासुद्धा मालमत्ता सोडवल्या गेल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्या पक्षात जात नाही म्हणून आमच्या मालमत्ता जप्त केल्या गेल्यात. किरीट सोमैयांनी आता वायकरांबाबत बोलावं. गैरसमजातून जर खोटे गुन्हे दाखल झाले, असं म्हटलं जातंय. तर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. तसंच आमचे सरकार आल्यावर हा गैरसमज कुठला होता याची चौकशी केली जाईल", असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट; जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यातून वायकर मुक्त - Ravindra Waikar Clean Chit
  2. 'मी त्यांच्यासारखा अल्कोहॉलिक नाही', रवींद्र वायकरांचा ठाकरेंवर निशाणा - Lok Sabha election results
  3. रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये, थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस - Ravindra Waikar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.