सांगली - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अडचणीत आहेत. त्यामुळे असे बोलत आहेत. जर ठाकरेंबद्दल प्रेम असते तर मोदींनी शिवसेना बेईमान माणसाकडे सोपवले नसती. मोदींनी खिडकी काय, दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही. त्यांच्या दारात जाणार नाही," असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
खासदार संजय राऊत म्हणाले, " पूर्वीच्या काळातील हिंदी सिनेमातील सर्व व्हिलन (खलनायक) एकत्र केल्यावर व्हिलन तयार होतो. त्याचं नाव देवेंद्र फडणवीस, असे शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. सांगली लोकसभेतील जागावाटपावरून काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. त्यावर खासदार राऊत म्हणाले, "सांगलीत आमच्यासमोर भाजपाचे दोन उमेदवार आहेत. एक काका आणि दादा, अशा शब्दात ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते राऊत यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली.
विशाल पाटील हे भाजपाचे अनधिकृत उमेदवार- खासदार संजय राऊत म्हणाले, " सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत करण्याचे काही जणांचे डावपेच आहेत. विशाल पाटील यांना भाजपाच रसद पुरवत आहे. तिरंगी लढत करण्यामागे कुणाचे डावपेच हे नंतर कळेल. एक भाजपचा अधिकृत उमेदवार आणि एक अनधिकृत उमेदवार आहे. भाजप नेत्याचा फौजफाटा सांगलीत येतोय. काही नेते काकासाठी तर काहीजण दादासाठी येत आहेत. काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत राहुल गांधींशी बोलणे झाले आहे. माझे बोलणे हे सर्वांना माहीत असल्याचेही राऊत म्हणाले.
तर 4 जूनला सत्कार करू- सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेत बोलताना विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना संबोधित करताना, " आपण देशाचे आणि महाराष्ट्राचे वाघ आहात. पण सांगलीचे वाघ आम्ही आहोत," असं सूचक विधान केलं होतं. यावर खासदार राऊत म्हणाले, शिवसेना ही सर्टिफाइड वाघ आहे. आमचे निशाणीच वाघ आहे. त्यामुळे विश्वजीत कदम सांगलीचे वाघ असतील तर त्यांनी चंद्रहार पाटलांना विजय करून वाघ असल्याचे सिद्ध करून दाखवावं. त्यांचा 4 जून रोजी आम्ही सत्कार करू, "असे आव्हान दिलं.
वाघ समोरून हल्ला करतो- ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते म्हणाले, " आम्ही वसंतदादा पाटील हे वाघ पाहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे वाघ पाहिले आहेत. वाघ झुडूपात समोरून हल्ला करत नाही. वाघ समोरून हल्ला करतो. सांगलीतील जनता डावपेच सहन करणार नाही. चंद्रहार पाटील यांनी शेतकऱ्यांचे पैसे आणि साखर कारखाने बुडविले नाहीत. त्यांचा हा कमजोरपणा आहे का? काँग्रेसचे नेते अनेक ठिकाणी कमी पडत आहेत. पण, त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून विजयी करणं ही आमची जबाबदारी आहे."
वाघांना जतन करणं गरजेचं- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना व्यासपीठावरून बोलताना विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली होती. "स्टेजवर एक आणि खाली एक भाषा करू नये, असे जयंत पाटील यांनी म्हटलं होते. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " जयंत पाटलांची डरकाळी ही वाघाचीच आहे. वाघाच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं. अलीकडच्या काळात सांगलीत मला बरेच वाघ दिसू लागले आहेत. त्यांचा जतन करणे गरजेचं आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा-