ETV Bharat / politics

"राज ठाकरेंना भेटून त्यांचा आशीर्वाद...", नेमकं काय म्हणाले सदा सरवणकर? माहीमचा पेच सुटणार? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

माहीम मतदारसंघातील पेच सुटायच्या जागी दिवसेंदिवस आणखी वाढत चाललाय. आता सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राज ठाकरेंसमोर एक मोठी अट ठेवली आहे.

Sada Sarvankar said he will meet Raj Thackeray and take his blessings too amid Maharashtra Assembly Election
माहीम विधानसभा मतदारसंघ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2024, 1:58 PM IST

मुंबई : मतदानाचा दिवस आता हळूहळू जवळ येऊ लागलाय. अशातच 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. सोमवारी कोणाविरोधात कोणाची लढत होणार याचं चित्र स्पष्ट होईल. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडोबांचं बंड शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर, दुसरीकडं महायुती आणि मनसेमधील माहीमच्या जागेवरील चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत.

एका बाजूला सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचं बोललं जातंय. तर, दुसरीकडं सदा सरवणकर यांनी यातील पेच अधिकच वाढवलाय. मनसेनं महायुती विरोधातील उमेदवार मागे घ्यावेत, तरच मी अर्ज मागे घेईल, अशी सदा सरवणकर यांनी अट घातल्यानं हा पेच अधिकच वाढलाय.

राज ठाकरेंची घेणार भेट : माहीममधील जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चांना आमदार सदा सरवणकर यांनी पूर्णविराम दिलाय. शनिवारी (2 नोव्हेंबर) दिलेल्या एका मुलाखतीत माहीममधील जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण उमेदवार मागे घेणार नसल्याचे संकेत दिले होते. अशातच आज (3 नोव्हेंबर) सदा सरवणकर यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय.

काय म्हणाले सदा सरवणकर? : या संदर्भात आमदार सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे. मागील पंधरा वर्षे मी माहीम विधानसभेचं प्रतिनिधित्व करतोय. मला महायुतीतील सर्व घटक पक्षांचा पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली. त्यांनी मला उमेदवारी अर्ज दिला. मला विश्वास आहे, जनता मलाच मतदान करेल. मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. मी सध्या सर्वांचा आशीर्वाद घेत आहे." तसंच राज ठाकरे यांचा देखील आशीर्वाद घेणारं असल्याचं आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. मनसेची साथ सोडवेना; भाजपाची राज ठाकरेंशी मैत्री म्हणजे शिंदेंसाठी 'धोक्याची' घंटा
  2. माहीम मतदारसंघात भाजपाची भूमिका काय? अमित ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
  3. सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "लढून जिंकण्यात जास्त..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.