नागपूर JP Nadda on RSS : भारतीय जनता पक्ष हा आता स्वयंपूर्ण झालेला आहे, त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज लागत नसल्याचं वक्तव्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांच्याचं भुवय्या उंचावल्या आहेत.
काय म्हणाले संघ अभ्यासक : जे पी नड्डा यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असावा हे समजून घेण्यासाठी संघ अभ्यासक वसंत काणे यांना विचारलं असता ते म्हणाले, "संघ परिवारातील संस्था स्वयंपूर्ण व्हाव्या ही तर संघाची भूमिका राहिलेली आहे. भारतीय जनता पक्ष आधीच स्वयंपूर्ण झालेला आहे. या वक्तव्यातून भाजपाचा अहंकार दिसत नाही, किंवा या वक्तव्यानं स्वयंसेवक नाराज ही होणार नाहीत." तसंच भारतीय जनता पक्ष राजकीय क्षेत्रात काम करणारी एक संघटना आहे, त्यामुळं त्यांना ज्यावेळी संघाची मदत लागेल तेव्हा ते त्यांची मदत घेत असतील. संघपासून आम्ही दूर असल्याचं वक्तव्य करुन धर्मनिरपेक्ष मतx मिळविण्याचा प्रयत्न असेल असं वाटत नसल्याचं देखील संघ अभ्यासक वसंत काणे म्हणाले.
भाजपा केव्हाच वेगळा झाला : संघाच्या प्रेरणेनं जी कार्यक्षेत्रं उभी राहिली, जे-जे प्रकल्प उभे झाले, संघटना आकाराला आल्यात त्या सर्वांनी स्वयंपूर्ण असावं आणि आपला संपूर्ण कारभार आपल्या बाबतीत स्वतंत्र असावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अपेक्षा ठेऊनच कार्य उभी केली आहेत. त्यामुळं माझ्या मते भाजपा तर केव्हाच वेगळा झालेला आहे. त्यामुळं हे वक्तव्य आता का आलं कारण एखादा प्रश्न या संदर्भात आला असेल. बाकी सर्व कुतर्क आहेत, असं वसंत काणे म्हणाले.
आरएसएसला शंभरवं वर्ष धोक्याचं : दुसरीकडे जे पी नड्डांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. ते म्हणाले, "भाजपाचे अध्यक्ष नड्डा म्हणाले की, देशात एकच पक्ष राहणार असून भाजपा हा आता स्वयंभू पक्ष झाला आहे. त्यांना आता आरएसएसची गरज नाही. त्यामुळं आरएसएसला शंभरावं वर्ष धोक्याचं असणार हे नक्की."
हेही वाचा :