ETV Bharat / politics

उमेदवारांच्या मनात धाकधूक; लोकसभा निवडणूक निकाल लागण्याआधी दिल्या प्रतिक्रिया, वाचा कुणाला काय वाटतंय... - Lok Sabha election results 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 4:57 PM IST

Lok Sabha election results 2024 : लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता संपुष्टात आला असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होतील. याबाबत राज्यातील काही उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Lokshabha Elections 2024
Lokshabha Elections 2024 (ETV Bharat)

मुंबई Lok Sabha election results 2024 : लोकसभा निवडणूक निकाल येत्या 4 जून रोजी प्रसिद्ध होणार आहेत. मतदारांमध्ये कोण निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. तर दुसरीकडं उमेदवारांमध्ये मतमोजणीच्या आदल्या दिवशी काहीशी धाकधूक आणि बराचसा विश्वास दिसतोय. मतमोजणीला अवघे काही तास उरले असतानाच राज्यातील विविध उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विजयाची खात्री आम्हाला पूर्वीपासूनच - अरविंद सावंत
मतमोजणीच्या दिवसासंदर्भात विचारलं असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत म्हणाले की, मी उद्याच्या दिवसाचा विचारच करत नाही. कारण विजयाची खात्री आम्हाला पूर्वीपासूनच आहे. आता मी आमच्या पक्षाच्या विधान परिषदेतील दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी नवी मुंबईतील कोकण भवन येथे आलोय. त्यामुळं मी पक्षाच्या कामात आणि कार्यकर्त्यांच्या कामांमध्ये नेहमीप्रमाणे व्यग्र आहे.

आमचा विजय निश्चित - यामिनी जाधव
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आमदार यामिनी जाधव यांना संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मी नेहमीप्रमाणे माझ्या मतदार संघात आहे. प्रचाराच्या अखंड धामधुमीनंतर माझ्या कुटुंबासोबत काही वेळ घालवता आला त्याबद्दल मी सध्या खुश आहे. माझ्या मनात उद्याच्या दिवसाबद्दल कुठलीही चिंता नाही, उद्या आमचा विजय पक्का असल्यानं मी निश्चिंत आहे. मनामध्ये कुठलीही धाकधूक अथवा भीती नाही, कारण जनतेनं मला भरभरून प्रतिसाद दिलाय. त्यामुळं मी विजयी होणार याची मला खात्री आहे, असंही यामिनी जाधव म्हणाल्या.

1000% हजार टक्के निवडून येणार - संजय दिना पाटील
मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील म्हणाले की, उद्या मतमोजणीच्या दिवशी काय तयारी चालू आहे याचा आम्ही आढावा घेतला. आमच्या मतदारसंघामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी संथ गतीनं मतदान घेतलं होतं. परंतु उद्याच्या निकालामध्ये जलद गतीनं आमचा विजय होईल, याची आम्हाला खात्री आहे. उद्याच्या दिवसाबद्दल माझ्या मनात काहीही शंका कुशंका नाहीत उलट 1000% आमचा विजय होणार आहे. त्यामुळं आम्ही सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि नेते उद्याच्या विजयाची वाट पाहात आहोत असंही ते म्हणाले. एक्झिट पोल काहीही असले तरी महाराष्ट्रातील परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही महाराष्ट्रातील जनतेनं हातात घेतली होती. त्यामुळं उद्याच्या निकालात जनतेच्या मतांचं प्रतिबिंब पाहायला मिळेल, असंही संजय दिना पाटील यावेळी म्हणाले.

निवडून येणार याची मला खात्री - राहुल शेवाळे
शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की, आपण गेल्या काही दिवसात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहोत. आजही आपण मानखुर्द परिसरातील एका विभागामध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतलीय. या परिसरातील स्थानिक मंदिरातही आपण दर्शन घेतलंय. मात्र हे दर्शन उद्याची धाकधूक म्हणून नव्हे तर दैनंदिन कामाचा भाग म्हणून आहे. या लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मला भरभरून प्रेम दिलंय. त्यांच्या प्रेमाच्या जोरावरच मी पुन्हा एकदा निवडून येणार याची मला खात्री आहे, म्हणून त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा मी या काळात सुद्धा प्रयत्न करतोय. उद्याच्या दिवसाची आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली असून विजयाचा गुलाल हा आम्हालाच लागणार याची खात्री असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह मला पाहायला मिळतोय, असंही शेवाळे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.