ETV Bharat / politics

पराभवाची जाणीव झाल्यानं माझ्या विरोधात कारस्थान रचलं; रश्मी बर्वे यांचा आरोप - Rashmi Barve VS Mahayuti

Rashmi Barve VS Mahayuti : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काही अंशी दिलासा दिलाय. मात्र, त्यानंतर रश्मी बर्वेंविरुद्ध महायुती असा सामना देखील सुरू झालाय.

Ashish Jaiswal and Rashmi Barve
आमदार आशिष जैस्वाल आणि रश्मी बर्वे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 9:51 PM IST

प्रतिक्रिया देताना आशिष जैस्वाल आणि रश्मी बर्वे

नागपूर Rashmi Barve VS Mahayuti : रश्मी बर्वेंच्या (Rashmi Barve) जात वैधता प्रमाणपत्र विरोधात भाजपा किंवा महायुतीकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. तर एका स्थानिक पत्रकारांनं ही तक्रार केली होती. तरी देखील रश्मी बर्वे भाजपा आणि महायुती विरोधात आरोप करत आहेत. आज न्यायालयानं त्यांना पूर्ण दिलासा दिलेला नाही. तरी देखील त्या सरकार विरोधात मोठी लढाई जिंकल्याचा भ्रम पसरवत असल्याचा आरोप, आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनी केलाय. तर या आरोपांना रश्मी बर्वे यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

रश्मी बर्वें विरुद्ध महायुती सामना : रश्मी बर्वे म्हणाल्या की, दलित समाजच्या एका महिलेकडून पराभव स्वीकारायचा नव्हता, म्हणून रातोरात कटकारस्थान रचून माझं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा भाजपा नेत्यांनी कट केलाय. त्यामुळं एकीकडं लोकसभा निवडणुकची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सुरू झाली असताना, रश्मी बर्वें विरुद्ध महायुती असा एक सामना नागपुरात रंगला आहे.

रश्मी बर्वेंना न्यायालयानं पूर्ण दिलासा दिलेला नाही : रामटेक लोकसभा मतदारसंघात जाणीवपूर्वक महाविकास आघाडीकडून भ्रम पसरवला जात असल्याचा आरोप महायुतीचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केलाय. सुनील साळवे यांनी रश्मी बर्वेंच्या विरोधात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली, त्यासाठी अनेक महिने त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवर रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलय. यामध्ये भाजपा, शिवसेनेना किंवा राज्य सरकारला काही घेणं देणं नाही, तरी देखील रश्मी बर्वे सातत्याने याकरता आम्हाला दोषी धरत आहेत. जात पडताळणी समितीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारणानं यापूर्वी आमचे देखील अनेक सरपंच, उपसरपंच हे अवैध झाल्याचं आशिष जैस्वाल यांनी सांगितलं.

सहानुभूती मिळवण्यासाठी खोटा प्रचार : आशिष जैस्वाल म्हणाले की, आज न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला नाही, शिवाय निवडणूक लढण्याची परवानगी दिलेली नाही. उच्च न्यायालयानं दिलासा दिला असाचं भ्रम रामटेक लोकसभा मतदारसंघात पसरवला जात आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी महाविकास आघडीचे नेते हे चुकीच्या पद्धतीनं प्रचार करत भ्रम पसरवत आहेत, अंतिरिम स्थगिती म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र पूर्ववत होत नाही. केवळ पराभवाच्या मानसिकतेतूनचं हा भ्रम निर्माण केला जात आहे.

खोटं जास्त काळ टिकू शकत नाही : श्री रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामटेक मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार शुद्ध चारित्र्याचा असावा अशी लोकांची धारणा आहे. त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसावे, पण श्याम बर्वे यांच्यावर दाखल गुन्हाची यादी बघावी असं देखील आशिष जैस्वाल म्हणाले.

मुंबईत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं मला न्याय दिलाय. माझे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करणं राजकीय कारस्थानाचा भाग होता. किती ही कटकारस्थान रचले तरी विजय हा सत्याचा होतो. - रश्मी बर्वे ,काँग्रेस नेत्या

रश्मी बर्वेंच्या भीतीपोटी हे कारस्तान : मी लोकसभा निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावी याकरता हे राजकीय कारस्थान रचण्यात आलं होतं. यांच मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मनात भीती होती. रश्मी बर्वे जर निवडणुकीच्या रणांगणात उतरली तर आपली हार ही नक्की आहे. त्यामुळं रातोरात कारस्थान रचण्यात आलं. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळं त्यांना चपराक बसली असं, रश्मी बर्वे म्हणाल्या.

नागपूरच्या मोठ्या नेत्याने धृतराष्ट्राची भूमिका बजावली. मला त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण त्यांनी देखील आपल्या पक्षाची बाजू घेण्याचं काम केलं. रश्मी बर्वेवर जेव्हा जेव्हा आघात कराल तेव्हा भाजपाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. माझं मनोबल कितीही कमी करा, तेवढ्याच ताकतीनं मी उभी राहीन. - रश्मी बर्वे ,काँग्रेस नेत्या

नवनीत राणाला एक आणि रश्मी बर्वेला दुसरा न्याय का? : दलित समाजाच्या महिलेकडून यांना पराभव स्वीकार कारायचा नव्हता म्हणून कारस्थान रचलं गेलं. नवनीत राणा यांना एक न्याय आणि रश्मी बर्वे यांना दुसरा न्याय का? सरकार पैसेवाल्याच्या पाठीशी आहे. उच्च न्यायालयानं निवडणूक लढवण्याच्या संदर्भात कोणताही आदेश दिलेला नाही, यासंदर्भात मी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं रश्मी बर्वे म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. "मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news
  2. नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले... - Navneet Rana
  3. खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला महायुतीमधून विरोध, शिंदे गट उमेदवार बदलणार? - Lok Sabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.