ETV Bharat / politics

रामटेकमध्ये काँग्रेसची टाईट; कोण देणार फाईट? 'वंचित'मुळं महाविकास आघाडीच्याही डोक्याला शॉट - Ramtek Lok Sabha elections

Ramtek Lok Sabha : लोकसभा निवडणुकांचं वारं सध्या देशभरात वाहत आहे. कोण कोणत्या पक्षात अन् कोणाचं कोणतं चिन्ह? याच संभ्रमात मतदार सध्या असल्याचं दिसतंय. पक्ष बदलणाऱ्यांची संख्या वाढली असून, यामुळं प्रत्येक पक्षाची डोकेदुखी वाढली असेल हे नक्की. रामटेक मतदारसंघाबाबतही असंच काहीसं चित्र आहे. जाणून घ्या...

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 6:47 AM IST

Updated : Mar 30, 2024, 7:48 AM IST

नागपूर Ramtek Lok Sabha : रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर आता रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमधून अधिकृत उमेदवार आहेत. रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सोमवारी सूनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, आता श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेसचे उमेदवार असणार हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा रामटेक लोकसभा मतदारसंघतील राजकीय समीकरण बदललंय.

काँग्रेससाठी कठीण? : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनचं रामटेक लोकसभा मतदारसंघात रोज धक्कादायक उलटफेर बघायला मिळत आहेत. सर्वात आधी काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी पक्ष सोडल्यांनंतर आता रश्मी बर्वे यांचा अर्जही बाद ठरल्याने काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्कीच ओढवली. रश्मी बर्वे यांच्या ऐवजी आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. श्यामकुमार बर्वे हे ग्रामपंचायत स्तरावर राजकारण करत असल्यानं त्यांना रामटेकची किती जाण असेल या संदर्भात मतदारसंघात काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.

रामटेक,काँग्रेस व केदारांचं राजकारण : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेसचे गेम चेंजर नेते अशी ओळख असलेल्या सुनील केदार यांना रोजच धक्के बसत आहेत. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला पहिला धक्का बसला. संभाव्य संधी ओळखून राजू पारवे यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतलं. बक्षीस म्हणून शिवसेनेकडून त्यांना रामटेकच्या मैदानात उतरवण्यात आलंय.

काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज? : काँग्रेसनं दिग्गज नेत्यांना नाराज करत रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली. अर्थात यामागं माजी मंत्री सुनील केदार यांची राजकीय खेळी होती, अशी चर्चा आहे. उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेत रश्मी रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानं काँग्रेसला दुसरा धक्का बसला. रामटेकमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. केदारांची खंदे समर्थक मनोहर कुंभारे भाजपामध्ये गेल्यामुळं काँग्रेसला तिसरा धक्का बसला. अद्याप प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली नसताना काँग्रेस व सुनील केदारांना एकामागोमाग धक्के बसत आहेत. त्यामुळं येत्या काळात राजकारण कोणत्या थराला जाईल हे सांगणं कठीण झालंय.

वंचित, अपक्ष वाढवणार काँग्रेसची डोकेदुखी : रामटेकमध्ये शंकर चहांदे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी ए बी फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडी रामटेक लोकसभा जागेसाठी आग्रही होती, पण काँग्रेसला ते मान्य नसल्यानं वंचितनं आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय. याशिवाय काँग्रेस नेते किशोर गजभिये हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. अमरावतीत बच्चू कडूंचा नवनीत राणांवर ‘प्रहार’, ठाकरे गटाच्या 'या' नेत्याला दिली उमेदवारी - Amravati Lok Sabha Election
  2. गोविंदाला करायचा होता ठाकरे गटात प्रवेश; 'या' नेत्याचा मोठा खुलासा - GOVINDA JOINS SHIVSENA
  3. सुषमा अंधारेंचा कॉन्फिडन्स खतरनाक; म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी...." - Lok Sabha Elections

Last Updated : Mar 30, 2024, 7:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.